भूसंपादनाविरोधात रेल्वेमंत्र्यांकडे मागणार दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 06:15 PM2020-08-25T18:15:23+5:302020-08-25T18:15:50+5:30
घोटी : मध्य रेल्वेने मनमाड ते इगतपुरी दरम्यान रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी घोटी ग्रामपालिका हद्दीतील जवळपास ७ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव ठेवला त्यामुळे घोटी शहरातील अनेक जमीनमालक विस्थापित होणार आहेत.
घोटी : मध्य रेल्वेने मनमाड ते इगतपुरी दरम्यान रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणासाठी घोटी ग्रामपालिका हद्दीतील जवळपास ७ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव ठेवला त्यामुळे घोटी शहरातील अनेक जमीनमालक विस्थापित होणार आहेत. या नागरिकांसह तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.२४) माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेतली. खासदारांनी याप्रश्नी लवकरच शिष्टमंडळासह केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल तसेच वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेण्याबाबतचे आश्वासन दिले.
मध्य रेल्वेने मनमाड ते इगतपुरी दरम्यान रेल्वेमार्गाचे रु ंदीकरण करण्याचे प्रस्तावित करून त्यासाठी जमीन भूसंपादनाची प्रक्रि या सुरू केली आहे त्यामुळे इगतपुरी तालुक्यातीळ रेल्वेमार्गालगतच्या गावांना भूसंपादनाच्या नोटीसा प्राप्त झाल्याने खळबळ उडाली. यानुसार पाडळी, मुकणे अस्वली, नांदूरवैद्य, आदी भागासह घोटी शहराच्या मध्यातून हा मार्ग प्रस्तावित झाल्याने घोटी शहरातील रिहवाशांचे मोठे क्षेत्र जाणार आहे त्यामुळे घोटी शहराचे विभाजन होऊन अनेक ग्रामस्थ व शेतकरी उघड्यावर येणार आहे. या प्रस्तावित भूसंपादनाला नागरिकांचा विरोध आहे.या प्रस्तावित रेल्वे मार्ग रु ंदी करणाविरोधात इगतपुरी तालुक्यातील सर्व शेतकरी एकवटले असून त्यांनी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वखाली खा हेमंत गोडसे यांची भेट घेतली या भेटीत खासदार गोडसे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली
दरम्यान यापूर्वीच रेल्वे विभागाकडे आधीच मोठ्या प्रमाणात भूसंपादन केलेले क्षेत्र आहे त्याच जागेतून रेल्वेने नवीन मार्ग व रु ंदीकरण करून स्थानिक शेतकरयांना दिलासा द्यावा. रेल्वेकडे रेल्वे लाईन लगत जमीन असल्याने नवीन भूसंपादन करण्याची गरज नसल्याचे खासदार गडसे यांच्या निदर्शनास आणून दिले.तसेच केंद्र व राज्यसरकार च्या अनेक प्रकल्पासाठी तालुक्याततुन मोठ्या प्रमाणात जमिनी दिल्या आहेत त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांना आता पुन्हा उध्वस्त करून देशोधडीला लावू नका असे नमूद केले. दरम्यान खासदार गोडसे यांनी याबाबत माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्यासह घोटीतील पदाधिकारी व शेतकºयांचे शिष्टमंडळ सोबत घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाºयांसह रेल्वेमंत्री ना पीयुष गोयल यांची भेट घेऊन आपले गाºहाणे त्यांच्यापर्यंत मांडू. अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली.