दारू दुकानविरोधात ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:41 AM2017-07-27T00:41:36+5:302017-07-27T00:41:50+5:30
इंदिरानगर : टागोरनगर परिसरातील दारू दुकानाच्या विरोधात सलग चौदाव्या दिवशी ठिय्या आंदोलन सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदिरानगर : टागोरनगर परिसरातील दारू दुकानाच्या विरोधात सलग चौदाव्या दिवशी ठिय्या आंदोलन सुरू असून, जोपर्यंत रहिवासी भागातून दुकान हलविण्यात येत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन चालू ठेवण्याची आक्रमक भूमिका महिलांनी घेतली आहे.
श्री श्री रविशंकर मार्गावरील महादेव अपार्टमेंटमध्ये महाराणी वाइन्स नावाने रहिवासी परिसरात देशी- विदेशी दारूचे दुकान सुरू करण्यात आले होते. परंतु परिसरात शाळा, मंदिरे, रहिवासी परिसर असल्याने आक्रमक महिलांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन करत दुकान बंद पाडले. सदर आंदोलनास परिसरातील शेकडो रहिवाशांनी पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत सदर दुकान हलविण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार महिलांनी केला असून, कोणत्याही परिस्थितीत दारू दुकान उघडू न देण्याचा निर्धार केला आहे. दुकान हलविण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे. सदर आंदोलनात नाना पाटील, डॉ. स्नेहा पाटील, ज्योती चांदवणी, सुशीला जाधव, दीपानंद सरस्वती, शीतल अडांगळे आदी सहभागी झाल्या होत्या.
चौदा दिवसांपासून ठिय्या
कोणत्याही परिस्थितीत रहिवासी परिसरात हे दुकान पुन्हा सुरू होऊ नये यासाठी आक्रमक भूमिका घेऊन मंडप टाकून सलग चौदा दिवसांपासून महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे.