दाभाडी- कॅम्प रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 04:43 PM2020-03-15T16:43:21+5:302020-03-15T16:45:44+5:30
मालेगाव शिवरोड : सटाणा रस्त्याला जोडणाऱ्या रोकडोबा नगरकडून मालेगाव कॅम्पकडे जाणा-या रस्त्याचे रु ंदीकरण होऊन चार महिने झाले मात्र डांबरीकरण करण्यात आलेले नसल्याने या भागात राहणा-या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सदर रस्त्याचे डांबरीकरण होणे रखडले असून सदर कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठ फिरवली आहे. दाभाडीकडून येणारा व कॅम्पला जोडणारा रस्ता दोन्ही भागांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे. हा रस्ता कॅम्पकडे जाणा-या लोकांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. सुरतकडून येणा-या प्रवाशांसाठी मालेगावच्या बाहेरून जाण्यासाठीचा हा महत्वाचा फाटा आहे. या रस्त्यावर प्रचंड वाहतूक वाढली असून रस्ता रु ंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. परंतु रु ंदीकरण वेगात पूर्ण करण्यात आले. आता डांबरीकरण त्याच गतीने पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. सटाणा रस्त्यापासून तर महानगरपालिका हद्दीपर्यंतचे अंतर साडेतीन किलोमीटर आहे. सदर रस्त्याचा मालेगावमधील व परिसरातील लोक सकाळी व सायंकाळी जॉँगींग ट्रॅक म्हणून उपयोग करतात. जर रु ंदीकरण झाले तर पायी फिरणारे व व्यायाम करणा-या नागरिकांची मोठी सोय होईल. शिवाय वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. यासाठी या रस्त्याचे डांबरीकरण लवकर व्हावे अशी मागणी दाभाडी ,रोकडोबानगर लोंढा नाला व शीवरोड नववसाहतीतील नागरिकांनी केली आहे.