‘दाभोलकर आपके कातिल अभी जिंदा हैं...’ : ‘जवाब दो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 08:21 PM2017-08-19T20:21:59+5:302017-08-19T20:25:07+5:30

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्या हत्येमधील संशयित अद्याप फरार आहे.

'Dabholkar your killer is alive ...': 'Answer two' movement | ‘दाभोलकर आपके कातिल अभी जिंदा हैं...’ : ‘जवाब दो’ आंदोलन

‘दाभोलकर आपके कातिल अभी जिंदा हैं...’ : ‘जवाब दो’ आंदोलन

Next

नाशिक : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्या हत्येमधील संशयित अद्याप फरार आहे. त्यांना अटक कधी? असा प्रश्न पुरोगामी संघटनेच्या वतीने मूक मोर्चा काढत उपस्थित करण्यात आला.
दाभोलकर यांच्या हत्येला चार वर्ष उलटली आहेत व पानसरे यांच्या खुनालाही जवळपास अडीच वर्षे पूर्ण होत असून, अद्याप या दोन्ही गुन्ह्यांमधील संशयित सारंग अकोलकर व विनय पवार यांना अटक करण्यात आलेली नाही. ही अटक कधी होणार? असा प्रश्न मूक मोर्चाद्वारे उपस्थित करत शनिवारी (दि.१९) पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘दाभोलकर आपके कातिल अभी जिंदा हैं...’ यासह सरकारी यंत्रणांचा निषेध नोंदविणारे फलक झळकविले. सरकारी यंत्रणेकडून गुन्हेगारांना पाठीशी घालत त्यांना शासन करण्यास दिरंगाई केली जात असल्यामुळे त्यांना जामीन मिळत असल्याचे मत ‘अंनिस’ने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. संशयित समीर गायकवाड याच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात सरकारने त्वरित दाद मागण्यासाठी अर्ज करावे. जोपर्यंत सनातनच्या संशयितांना अटक होत नाही तोपर्यंत विवेकवादी, पुरोगामी विचारांच्या लोकांच्या जिवाला धोका असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सरकारची तपास यंत्रणा आहे तरी कुठे अन् करते तरी काय? असा प्रश्नही निवेदनातून विचारण्यात आला आहे.नाशिक : महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉमे्रड गोविंद पानसरे यांच्या हत्येमधील संशयित अद्याप फरार आहे. त्यांना अटक कधी? असा प्रश्न पुरोगामी संघटनेच्या वतीने मूक मोर्चा काढत उपस्थित करण्यात आला.
 

Web Title: 'Dabholkar your killer is alive ...': 'Answer two' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.