दादा भुसे : उड्डाणपुलाचा प्रस्ताव राष्टÑीय प्राधिकरण विभागाकडे सादर करण्याच्या आढावा बैठकीत सूचना कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:40 PM2017-09-28T23:40:32+5:302017-09-29T00:09:18+5:30
राष्टÑीय महामार्गावरील अपघातात दररोज शेकडो नागरिकांचा मृत्यु होत आहे. याचे गांभीर्य राष्टÑीय प्राधिकरण विभागाला नसल्याचे दिसून येत आहे. येत्या पंधरा दिवसात अपघातप्रवण क्षेत्रात तातडीने उपाययोजना करा तसेच तालुक्यातील टेहरे येथे गतिरोधक, पथदीप, साईडपट्ट्यांची दुरूस्ती यासह उड्डाणपुलाचा प्रस्ताव तातडीने दिल्लीच्या राष्टÑीय प्राधिकरण विभागाकडे सादर करा, असे आदेश ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
मालेगाव : राष्टÑीय महामार्गावरील अपघातात दररोज शेकडो नागरिकांचा मृत्यु होत आहे. याचे गांभीर्य राष्टÑीय प्राधिकरण विभागाला नसल्याचे दिसून येत आहे. येत्या पंधरा दिवसात अपघातप्रवण क्षेत्रात तातडीने उपाययोजना करा तसेच तालुक्यातील टेहरे येथे गतिरोधक, पथदीप, साईडपट्ट्यांची दुरूस्ती यासह उड्डाणपुलाचा प्रस्ताव तातडीने दिल्लीच्या राष्टÑीय प्राधिकरण विभागाकडे सादर करा, असे आदेश ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.
मुंबई- आग्रा महामार्गावरील टेहरे गावा जवळ धुळेकडून येणाºया कंटेनर क्रमांक एच. आर. ५५ ए. बी. ५०६६ याने रस्ता ओलांडणाºया दुचाकी क्र. एम.एच.४१ एम. २७४५ हिला जबर धडक दिली. या भीषण अपघातात संजय अर्जुन पवार (३४) रा. आदिवासी वस्ती व अवि विजय जाधव (१३), ऋषीकेश राजेंद्र जाधव (९) दोघे रा. टेहरे यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या टेहरे ग्रामस्थांनी मुंबई-आग्र महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले होते. उड्डाणपुलाच्या मागणीसाठी तब्बल दीड तास आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची माहिती कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित हगवणे, छावणीचे पोलीस निरीक्षक इंद्रजीत विश्वकर्मा यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलनकर्त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक मागणीवर ठाम होते. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी भ्रमणध्वनीवरुन याबाबत तातडीने बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले. तसेच नायब तहसिलदार वसंत पाटील यांनी बैठक घेण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. त्यानुसार गुुरुवारी येथील शासकीय विश्रामगृहावर प्रांताधिकारी अजय मोरे, तहसिलदार शिवकुमार अवळकंठे, राष्टÑीय प्राधिकरण विभागाचे अभियंता एस. जी. अडसुळे, सोमा टोल वे कंपनी संजय गुरव आदिंच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी राष्टÑीय प्राधिकरण विभागाच्या अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले. महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांवर तातडीने उपाययोजना करा, दररोज होणाºया अपघातात अनेकांचा जीव जात आहे. याचे सोयरसुतक राष्टÑीय प्राधिकरण विभागाला नाही. महिनाभरात ठोस निर्णय घेतले नाही तर यापुढे घडणाºया घटनांना राष्टÑीय प्राधिकरण विभाग जबाबदार राहील. असा सज्जड दम भरत धुळे व नाशिक बाजुकडून येताना मालेगावचे प्रवेशद्वारच दिसत नाही. यामुळे वाहनधारकांचा गोंधळ उडतो. १० लाख लोकवस्ती असलेल्या मालेगाव शहराचे प्रवेशद्वार योग्य पद्धतीने करावे, तसेच मुंगसे येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी भुयारी मार्ग व सर्व्हिसरोड तयार करुन द्यावा अशा सूचना केल्या. टेहरे येथील महामार्गावर येत्या पंधरा दिवसात पथदीप, साईडपट्ट्यांची दुरूस्ती, उड्डाणपुलाचा प्रस्ताव राष्टÑीय प्राधिकरण विभागाकडे तातडीने सादर करा असे आदेश राज्यमंत्री भुसे यांनी दिले आहेत. बैठकीस राजेंद्र शेवाळे, माजी उपसरपंच प्रभाकर शेवाळे, भरत शेवाळे, संदीप शेवाळे, नाना शेवाळे, विजय शेवाळे, नीलेश पाटील आदिंसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.