खाते वाटपात दादा भुसे यांना पदोन्नती, भुजबळ जैसे थे!
By संजय पाठक | Published: July 14, 2023 06:37 PM2023-07-14T18:37:31+5:302023-07-14T18:37:56+5:30
राज्यात मेाठी राजकीय घडामोड घडली आणि शिवसेना फुटल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या सत्तेत दादा भुसे यांना बंदरे व खनी कर्म मंत्रीपद मिळाले.
नाशिक- राज्यातील मंत्री मंडळाच्या खाते वाटपात पालकमंत्री दादा भुसे यांनी बाजी मारली असून त्यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) अशी पदोन्नतीचे खाते मिळाले आहे. त्या तुलनेत ब्रेक के बाद भुजबळ यांना मात्र अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात आल्याने त्यांचे खाते जैसे थे आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना देखील नाशिकला हेच दोन मंत्री लाभले होते. त्यातील दादा भुसे यांच्याकडे कृषीमंत्री पद देण्यात आले. तर छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाते भुजबळ यांच्याकडे होते.
दरम्यान राज्यात मेाठी राजकीय घडामोड घडली आणि शिवसेना फुटल्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या सत्तेत दादा भुसे यांना बंदरे व खनी कर्म मंत्रीपद मिळाले. त्यामुळे ते नाराज असल्याचेच सांगितले जात होते. त्यामुळेच नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जात असताना प्रत्यक्षात मात्र, दादा भुसे यांच्याकडे आले. राज्यातील नव्या सत्ता समिकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली आणि नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळाल्याने त्यांना वजनदार खाते मिळेल अशी चर्चा हेाती. मात्र, एकुण मंत्रीपदाच्या वाटपात त्यांना पूर्वी प्रमाणेच महाविकास आघाडीच्या काळापासून असलेले
अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपद देण्यात आले आहे. तर दादा भुसे यांना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाते देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना चांगले खाते मिळाले आहे. त्या तुलनेत भुजबळ मात्र जैसे थे राहीले आहेत.