दादा पीरबाबा महाराज ग्रामदैवत यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 06:58 PM2019-04-23T18:58:16+5:302019-04-23T18:59:01+5:30
औंदाणे : जुनी शेमळी (ता. बागलाण)येथील ग्रामदैवत दादा पीरबाबा महाराज यांच्या दोन दिवसीय यात्रोत्सवास बुधवार (दि.२४) पासुन सुरु वात होणार आहे
औंदाणे : जुनी शेमळी (ता. बागलाण)येथील ग्रामदैवत दादा पीरबाबा महाराज यांच्या दोन दिवसीय यात्रोत्सवास बुधवार (दि.२४) पासुन सुरु वात होणार आहे
येथील पिरबाबा यात्रोत्सवाची अनेक वर्ष जुनी परंपरा असून विशेष म्हणजे ह्या यात्रोत्सवाची सुरु वात गावात एकही मुस्लिम कुटुंब नसतांना झालेली आहे ही वाखाणण्याजोगी आहे. ह्या वर्षाचे यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे आदिवासीं लोकनृत्य.
यात्रोत्सवासाठी मंदिर परिसरात व गावात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रोत्सवाची सुरु वात सकाळी मांडव टाकण्यापासून होते. सायंकाळी सजविलेल्या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येते. तसेच गावात विविध प्रकारची दुकाने थाटून यात्रा भरते. बुधवारी (दि. २४) रात्री सोमनाथ नगरदेवळेकर अमळनेर, यांचा लोकनाट्य तमाशा रात्री ९ वाजता आयोजित केला आहे. गुरूवारी (दि.२५) दुपारी ४ वाजता कुस्त्यांची दंगल आयोजित केली आहे. कुस्तीपटूंनी सहभागी होण्याचे आवाहन ग्रामस्थ व यात्रा कमिटी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
(फोटो २३ पीरबाबा)