इगतपुरी शहरात कचऱ्याचे ढिग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 03:31 PM2018-08-24T15:31:11+5:302018-08-24T15:34:58+5:30

घोटी: नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन केंद्र व जागतिक दर्जाच्या विपश्यना केंद्रामुळे संपूर्ण देशात नावारूपास आलेल्या इगतपुरी शहर कचºयाच्या ढिगांनी व्यापले असून हे शहर इगतपुरी की बकालपुरी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 Daggers in Igatpuri | इगतपुरी शहरात कचऱ्याचे ढिग

इगतपुरी शहरात कचऱ्याचे ढिग

Next
ठळक मुद्देनाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या इगतपुरी शहराला ऐन पावसाळ्यात अस्वच्छतेने ग्रासले आहे.शहरातील घनकचº्याच्या नियोजनाच्या अभावामुळे शहरातील मुख्य रस्त्यासह नगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत असणाºया गावात मोठ्या प्रमाणात कचºयाचे मोठे ढीग साचत आहेत.या कचºयाच्


घोटी:
नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन केंद्र व जागतिक दर्जाच्या विपश्यना केंद्रामुळे संपूर्ण देशात नावारूपास आलेल्या इगतपुरी शहर कचºयाच्या ढिगांनी व्यापले असून हे शहर इगतपुरी की बकालपुरी असा प्रश्न उपस्थित होत आहे.शहरातील नगरपालिका प्रशासनाकडून शहर स्वच्छतेची उदासीनता असल्याने शहरातील प्रत्येक भागात कचº्याचे मोठ्या प्रमाणात दीड साचत असल्याने शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या इगतपुरी शहराला ऐन पावसाळ्यात अस्वच्छतेने ग्रासले आहे.शहरातील घनकचº्याच्या नियोजनाच्या अभावामुळे शहरातील मुख्य रस्त्यासह नगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत असणाºया गावात मोठ्या प्रमाणात कचºयाचे मोठे ढीग साचत आहेत.या कचºयाच्या ढिगामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दरम्यान पावसाळ्यात या शहरात राज्यातील पर्यटक दाखल होतात तर जागतिक दर्जाच्या विपश्यना केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात जगभरातून साधक दाखल होतात.मात्र शहराची अस्वच्छता पाहिल्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान इगतपुरी शहराची स्वच्छता राखण्यासाठी नियमतिपणे कचर्याचे संकलन करून विल्हेवाट लावावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
 

Web Title:  Daggers in Igatpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.