दहीहंडीचा जल्लोष : बसस्थानकात गोपिकांनी फोडली दहीहंडी;
By admin | Published: August 19, 2014 10:42 PM2014-08-19T22:42:36+5:302014-08-20T00:41:35+5:30
शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेलागोविंद बोलो, हरि गोपाल बोलो...
सिन्नर : शहर व तालुक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडली, तर दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याला गोविंदा पथकांनी मोठ्या उत्साहात दहीहंड्या फोडून जल्लोष केला. ‘गोविंद बोलो, हरि गोपाल बोलो..’, ‘गोविंदा आला रे...’च्या गजराने परिसर दणाणून गेला होता.तालुक्यातील विविध शाळांमध्ये सुट्यांमुळे आदल्या दिवशी, तर काही शाळांत दुसऱ्या दिवशी बाल गोविंदांनी दहीहंडीचा आनंद लुटला.
राज्य परिवहन आगारातील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पाथरे येथील महानुभाव आश्रमाचे दामोदर बाबा महानुभाव यांनी कृष्णलीला व श्रीकृष्णाची महती सांगितली. यावेळी आगार व्यवस्थापक दिलीप जाधव, सौ. मीराबाई गोसावी, मीराताई दराडे, मनेगावच्या सरपंच सुनंदा सोनवणे, कलावती सांगळे आदि उपस्थित होते. दत्ता गोसावी यांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले.
येथील एस. टी. आगाराच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी सिन्नर येथून जाळीचा देव, नारायणपूर, पंढरपूर, जेजुरी, रिद्धपूर, सप्तशृंगगड, अष्टविनायक दर्शन तसेच राज्याच्या बाहेर मथुरा, द्वारका, वृंदावन दर्शन येथे खास बस सेवा सुरू करण्यात आली असून, साडेतीन शक्तिपीठ असलेल्या माहूरची रेणुका, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तशृंगी या साडेतीन शक्तिपीठांच्या दर्शनासाठी बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगारव्यवस्थापक दिलीप जाधव यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी संघटनेचे प्रमोद घोलप यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी योगेश खाडे, विजय उगले, गणेश उगले, संपत पगार, अनिल कटारनवरे, एस. एस. शिंदे, बी. आर. आव्हाड, पी. एस. बिन्नर, विजय ओतारी, सुधाकर जाधव, जी. टी. सानप, डी. बी. खाटेकर आदिंसह आगारातील कर्मचारी, नागरिक, भाविक उपस्थित होते.
पाडळी
येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या वतीने मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या गोविंदा पथकाने ‘गोविंदा आला रे आला’च्या गजरात तीन थर रचून दहीहंडी फोडली. झांज पथक, लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला.
विद्यार्थ्यिनींनी म्हटलेल्या ‘गोविंदा आला रे...’ या गाण्याच्या सुरात विद्यालयातील सात विद्यार्थ्यांनी तीन थराचा मानवी मनोरा करून अजय रेवगडे याने दहीहंडी फोडली. याप्रसंगी प्रा. टी. एस. ढोली, सरपंच अशोक रेवगडे, बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, श्रीमती एम. एम. शेख, सौ. सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी. व्ही. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस.
ढोली आदिंसह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते. (वार्ताहर)