इंदिरानगर परिसरात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:35 AM2017-11-18T00:35:23+5:302017-11-18T00:36:01+5:30
परिसरात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्येत दिवसागणिक वाढ होत असून, महापालिकेचा आरोग्य विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
इंदिरानगर : परिसरात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्येत दिवसागणिक वाढ होत असून, महापालिकेचा आरोग्य विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. परिसरात डेंग्यूसदृश आजाराने डोके पुन्हा वर काढले आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, डेंग्यूसदृश रुग्णांच्या शरीरातील पांढºया पेशी आणि प्लेटलेट कमी होत असल्याने तातडीने रुग्णालयात संबंधित रुग्णाला दाखल करावे लागत आहे. औषधोपचारासाठी आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. जेव्हा मलेरिया विभागाला समजते की, या ठिकाणी डेंग्यूसदृश रुग्ण आहेत तेव्हाच धूरफवारणी केली जात असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात डेग्यूचे वाढते रुग्ण व डासांचा वाढता प्रादुर्भाव तसेच ठिकठिकाणी साचलेले कचºयाचे ढीग यावर उपाययोजनेसाठी महापौरांनी तातडीने बैठक बोलावली होती. परंतु त्यानंतरही इंदिरानगर परिसरात परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
धूर फवारणीची मागणी
धूर फवारणी चारचाकी वाहनातून भरधाव वेगाने केली जात असल्याने ती फक्त रोड शो ठरत आहे. छोट्या मशीनद्वारे धूर फवारणी करण्याची मागणी पूर्व प्रभाग सभेत नगरसेवकांनी करूनसुद्धा मनपा प्रशासन ढिम्म आहे. धूर फवारणी नियमित केव्हा होणार, असा प्रश्न संतप्त नागरिकांनी केला आहे.