दुग्ध व्यवसाय अडचणीत; शेतकऱ्यांना आर्थिक झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 09:10 PM2020-07-08T21:10:36+5:302020-07-09T00:31:31+5:30

कवडदरा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प होते. मात्र महिनाभरापासून ग्रामीण भागात लॉकडाऊन शिथिल झाल्याने व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असली तरी दुधाच्या दरात घट आणि डेअरीचालकांकडून केली जाणारी लूट यामुळे जनावरांचा चारा व खुराकचा खर्चदेखील भागत नसल्याने इगतपुरी तालुक्यात दूध व्यवसाय अडचणीत आहे.

Dairy business in trouble; Economic hardship to farmers | दुग्ध व्यवसाय अडचणीत; शेतकऱ्यांना आर्थिक झळ

दुग्ध व्यवसाय अडचणीत; शेतकऱ्यांना आर्थिक झळ

googlenewsNext

कवडदरा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प होते. मात्र महिनाभरापासून ग्रामीण भागात लॉकडाऊन शिथिल झाल्याने व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असली तरी दुधाच्या दरात घट आणि डेअरीचालकांकडून केली जाणारी लूट यामुळे जनावरांचा चारा व खुराकचा खर्चदेखील भागत नसल्याने इगतपुरी तालुक्यात दूध व्यवसाय अडचणीत आहे.
कोरोनामुळे ग्रामीण व शहरी भागात मार्च महिन्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यापूर्वी दुधाचे दर तीस ते पस्तीस रुपये लिटर होते. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर तेच दर पंधरा ते वीस रुपयांपर्यंत खाली आले. त्यामुळे साधारण पन्नास लिटर दूध असणाºया उत्पादकाला वीस हजार रुपये तोटा सहन करावा लागत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय केला जातो. मात्र तीन महिन्यापासून दुधाच्या बिलातून जनावरांचा खुराक व चाºयाचा खर्चही भागत नाही. सध्याच्या काळात जनावरांचे आठवडे बाजारही कोरोना लॉकडाऊनमुळे होत नाहीत. त्यामुळे मिळेल त्या दरात दूध डेअरीवर द्यावे लागते.
डेअरीचालकाकडून शेतकऱ्यांना डिग्री, कमी फॅटचे कारण देऊन कमी भाव दिले जात आहेत. काही डेअºयांवर दूध उत्पादकांना स्पष्ट दिसेल असा वजन काटाही नसतो. अशा अनेक कारणांनी दूध उत्पादक अडचणीत आले आहेत.
----------------------
दुधाला चांगला भाव नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. प्रतिलिटर मागे दहा रुपये अनुदान सरकारने द्यायला हवे. अन्यथा शेतकरी दूध व्यवसायापासून दूर जातील.
- दिलीप निसरड, दूध व्यावसायिक, कवडदरा

सध्या दूध उत्पादकाकडून संकलित केलेल्या दुधाची विल्हेवाट लावण्यासाठी कसरत करावी लागते. बाजारपेठेत उठाव नसल्याने दुधापासून वेगवेगळे पदार्थ बनवणाºया कंपन्याही बंद आहेत. काही चालू असणाºया कंपन्या कमी भावात दूध खरेदी करतात. यामध्ये शासनाने लक्ष घालावे.
- सचिन जुंदरे, शेतकरी, भरवीर खुर्द

Web Title: Dairy business in trouble; Economic hardship to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक