दुग्ध व्यवसाय अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:22 AM2018-07-19T00:22:37+5:302018-07-19T00:27:56+5:30
सायखेडा : गायी सांभाळून दूध विक्र ी करून गुजराण करणाऱ्या शेतकºयांना प्रत्येक दिवशी एका गायीच्या दुधामागे किमान ७० रुपये तोटा सहन करावा लागत असल्याने दुधाचे अर्थकारण जमत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे
सायखेडा : गायी सांभाळून दूध विक्र ी करून गुजराण करणाऱ्या शेतकºयांना प्रत्येक दिवशी एका गायीच्या दुधामागे किमान ७० रुपये तोटा सहन करावा लागत असल्याने दुधाचे अर्थकारण जमत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
एक गाय सांभाळण्यासाठी दिवसाला सुका आणि हिरवा चाºयासाठी दोनशे रुपये, पशुखाद्य १५० रुपये, औषधे ५० रुपये, देखभाल खर्च ५० रुपये असा सरासरी एकूण ४५० रुपये इतका खर्च येतो. एक गाय साधारण १५ ते २० लिटर दूध देते. आज कोणताही दूध संघ १९ रु. प्रतिलिटर या दराने दूध खरेदी करताना दिसत आहे. या भावात ३५० रुपये आर्थिक उत्पन्न मिळते. शेतकºयांना प्रतिदिवशी ७० रुपये तोटा सहन करावा लागत आहे.
गायीला केवळ एकच चारा दिल्यास दुधाची फॅट चांगली लागत नाही. फॅटनुसार दररोज दुधाच्या भावात फरक पडतो त्यामुळे सुका, हिरवा, पशुखाद्य असा संमिश्र चारा द्यावा लागतो. या चाºयाचे बाजारात उपलब्धतेनुसार दररोज भाव बदलतात. मात्र दुधाचे भाव वाढत नाही ते नेहमी कमीच होतात. त्याचा आर्थिक फटका बसत असतो तो शेतकºयांनाच सहन करावा लागतो.
नाशिक जिल्ह्यात अंदाजे सरासरी २ लाख गायी असून, किमान ४० हजार शेतकºयांचे कुटुंब दुग्धव्यवसायावर अवलंबून आहे.
अनेकांना दुसरा कोणताही आर्थिक उत्पादनाची संधी नसल्याने कुटुंब सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे. शेतकºयांना दुग्ध जनावरे सांभाळताना मोठी कसरत करावी लागत आहे.
शहरी भागातील नागरिक किरकोळ दूध घेताना जास्त पैसे मोजत असले तरी दूध उत्पादक शेतकºयांच्या हातात मात्र कमी पैसे मिळत आहे. त्यामुळे दुधाचे अर्थकारण जुळत नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.गायीच्या दुधाला दूध संघाकडून १९ रु . प्रतिलिटर भाव मिळत असल्याने दुधाचे अर्थकारण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. चारा, पशुखाद्य, औषधे असा खूप खर्च येतो, तुलनेत पैसे होत नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय दिवसेंदिवस अडचणीत येत आहे. सरकारने थेट अनुदान देण्याची गरज आहे.
- संजय गामणे,
दूध उत्पादक, वºहेदारणा