दूध उत्पादक शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:40 IST2021-05-18T20:47:43+5:302021-05-19T00:40:20+5:30

कवडदरा : शेतीला पूरक म्हणून ओळखला जाणारा दूध व्यवसाय सध्या कमालीचा अडचणीत सापडला आहे. सध्या दुधाला २२ रुपये दर ...

Dairy farmers in trouble | दूध उत्पादक शेतकरी अडचणीत

दूध उत्पादक शेतकरी अडचणीत

कवडदरा : शेतीला पूरक म्हणून ओळखला जाणारा दूध व्यवसाय सध्या कमालीचा अडचणीत सापडला आहे. सध्या दुधाला २२ रुपये दर मिळत असल्याने पशुपालन करणे जिकिरीचे झाले आहे. आर्थिक मंदी व कोरोना संकट यात दूध व्यवसाय अधिकच अडचणीत येऊ लागला आहे. गेल्या पाच महिन्यांत पशुखाद्याच्या किमती वाढत चालल्याचे विदारक चित्र आहे.

इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, भरवीर, पिंपळगाव डुकरा, घोटी खुर्द परिसरातील बहुतेक शेतकरी दूध व्यवसायावर अवलंबून आहेत. दूध उत्पादकांच्या अडचणी दूर करण्याकरिता त्यांना अनुदान देणे गरजेचे आहे.
गोल्डन क्रेडिट कार्ड म्हणून ओळख असलेल्या दूध व्यवसाय पुरता काळवंडला आहे. सध्या कोरोना महामारीच्या कचाट्यात दूध व्यवसायही नासला आहे. कधी काळी ३३ रुपयांपर्यंत गेलेला दुधाचा दर दहा रुपयांनी खाली आला आहे.
ग्राहकांना मात्र ४४ रुपये प्रतिलिटर दूध विकत घ्यावे लागते. डिसेंबरमध्ये हजार, अकराशे रुपयांना मिळणारे ५० किलोचे पशुखाद्याचे पोते मात्र १८०० रुपयाला घेणे भाग पडते. आता पशुधन कसे संभाळावे, हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

कोरोनामुळे जनावराचे बाजार बंद असल्याने ते विकता येत नाहीत. उन्हाळ्यात हिरवा चारा मिळणे अवघड झाले आहे. दुहेरी संकटाला दूध उत्पादक शेतकरी सामोरे जात आहेत. शेतकऱ्यांच्या दूध प्रश्नांवर सरकार तसेच विरोधी पक्ष गंभीर नाही. त्यामुळे त्यांची घुसमट होत आहे.

शेतकऱ्यांकडून २२ रुपये दराने गायीचे दूध खरेदी करून ग्राहकांना ४४ रुपये म्हणजे लिटरमागे तब्बल २२ रुपयांची नफारूपी मलई मधले दलाल खात आहेत. मोठ्या शहरात दूध विक्रेत्याला लिटरमागे किमान सहा रुपये कमिशन व १० लिटरवर १ लिटर दूध फ्री अशी १०:१ अशी स्कीम राबविली जात आहे. म्हणजे दूध विक्रेत्याला लिटर मागे १० ते १२ रुपये कमिशन मिळत आहे.
- सचिन झनकर, दूध उत्पादक शेतकरी, भरवीर बु. (१८ मिल्क)

Web Title: Dairy farmers in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.