‘दाजी’ दानवेंचा नाशिकचे शेतकरी ‘साले’ करणार सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 02:33 PM2017-11-24T14:33:06+5:302017-11-24T14:39:06+5:30
अतिथी देवो भव ही महाराष्टÑाची संस्कृती व परंपरा असून, त्यात अतिथी म्हणून जर जावई असेल तर पाहुणा म्हणून त्याचा विशेष सन्मान करणे महाराष्टÑाचे शेतकरी आपले कर्तव्य समजतो, या कर्तव्य, परंपरेशी बांधिलकी ठेवूनच नाशिकच्या दौ-यावर येत असलेले प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचा विशेष सत्कार करणार आहे.
नाशिक : नाशिका महापालिकेच्या विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी नाशिक दौ-यावर येत असलेले भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांबाबत आजवर केलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध म्हणून शेतकरी संघटनांची सुकाणू समितीने त्यांचा शासकीय विश्रामगृहावर पारंपारिक पद्धतीने सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात सुकाणू समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अतिथी देवो भव ही महाराष्टÑाची संस्कृती व परंपरा असून, त्यात अतिथी म्हणून जर जावई असेल तर पाहुणा म्हणून त्याचा विशेष सन्मान करणे महाराष्टÑाचे शेतकरी आपले कर्तव्य समजतो, या कर्तव्य, परंपरेशी बांधिलकी ठेवूनच नाशिकच्या दौ-यावर येत असलेले प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचा विशेष सत्कार करणार आहे. दानवे यांनी तूर खरेदी संदर्भात शेतकºयांना उद्देशून केलेल्या अवमानकारक शब्द प्रयोगाने परिस्थितीने बेजार झालेल्या शेतक-यांच्या भावना दुखावणारे होते, त्याच बरोबर विधानसभा निवडणूक प्रचारा दरम्यान ‘लक्ष्मी’दर्शनाचा केलेले वक्तव्य लोकशाहीची मुल्ये पायदळी तुडविणारे होते, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव गोळीबाराविषयी केलेले वक्तव्य पाहता अन्नदात्याविषयी त्यांच्या असलेल्या भावना व्यक्त होतात त्यामुळे शेतक-याचे ‘जावाई’ लागणा-या पाहुण्याचा विशेष सत्कार करण्याचा मान नाशिक जिल्ह्याला मिळाला असून, त्या प्रित्यर्थ शनिवारी सकाळी शासकीय विश्रामगृह, त्र्यंबकरोड येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. सत्कारात पाहुण्यांना वारकरी संप्रदायाचे प्रतिक असलेला बुक्का लावून औक्षण केले जाणार आहे, तसेच काळी शााल, काळे कपडे देवून सत्कार करण्यात येणार आहे. या पत्रकावर राजु देसले, हंसराज वडघुले, नाना बच्छाव, प्रकाश चव्हाण, किसन गुजर, यश बच्छाव, करण गायकर, गणेश कदम आदींच्या स्वाक्षºया आहेत.