द्वारकाचा ‘चक्रव्यूह’ बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 01:34 AM2018-07-07T01:34:07+5:302018-07-07T01:34:28+5:30

नाशिक : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि दोन महामार्गांना छेदणाऱ्या चौफुली म्हणजे द्वारका असली तरी मुळातच याठिकाणी अनेक मार्ग एकत्र येत असल्याने त्याला चौक म्हणणेही कठीण आहे. सात ते आठ ठिकाणचे रस्ते एकाच ठिकाणी येत असल्याने सर्व भार या एकाच ठिकाणी असतो. द्वारकावरील वाहतूक कोंडीचा चक्रव्यूह भेदणे दिव्यच मानले जाते. अनेक पर्याय आखले गेले आणि अमलातही आले परंतु उपयोग झालेला नाही. उड्डाणपूल झाल्यानंतर याठिकाणी भुयारी पादचारी पूलही बांधण्यात आला परंतु वर्षांनुवर्षे असलेली ही जटील समस्या मात्र अद्याप सुटलेली नाही.

Dakarka's 'Chakravyuhah' is complicated | द्वारकाचा ‘चक्रव्यूह’ बिकट

द्वारकाचा ‘चक्रव्यूह’ बिकट

Next
ठळक मुद्दे समस्या : उड्डाणपुलाने आणखीनच वाढली कोंडी

नाशिक : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि दोन महामार्गांना छेदणाऱ्या चौफुली म्हणजे द्वारका असली तरी मुळातच याठिकाणी अनेक मार्ग एकत्र येत असल्याने त्याला चौक म्हणणेही कठीण आहे. सात ते आठ ठिकाणचे रस्ते एकाच ठिकाणी येत असल्याने सर्व भार या एकाच ठिकाणी असतो. द्वारकावरील वाहतूक कोंडीचा चक्रव्यूह भेदणे दिव्यच मानले जाते. अनेक पर्याय आखले गेले आणि अमलातही आले परंतु उपयोग झालेला नाही. उड्डाणपूल झाल्यानंतर याठिकाणी भुयारी पादचारी पूलही बांधण्यात आला परंतु वर्षांनुवर्षे असलेली ही जटील समस्या मात्र अद्याप सुटलेली नाही.
मुंबई-आग्रा महामार्ग आणि नाशिक-पुणे मार्गावर असलेल्या या चौफुलीला सर्व्हिसरोड बरोबर अमरधामकडून येणारा रस्ता तसेच अन्य अनेक उपमार्ग आहेत. व्यापारी संकुले, हॉटेल्स तसेच परिसरात शाळादेखील आहेत. त्यात अतिक्रमणांची भरदेखील आहे. शहरातून नाशिकरोडकडे जाणारी आणि नाशिकरोडकडून शहराकडे येणाºया वाहनांची संख्या प्रचंड आहे. शिवाय त्यात अवजड वाहनेदेखील असतात. द्वारका चौफुलीवर कुठूनही कुठे जायचे असेल तर वाहतुकीच्या जंजाळातून बाहेर पडणे एक अग्निदिव्यच असते. वाहतूक पोलीस नसतील तर या चौकातून प्रवास करणेच जणू अशक्य ठरले आहे. वाहतूक पोलिसांनी एका बाजूची वाहतूक रोखून धरली नाही तरी वाहने सुटतात आणि वाहतुकीचा गुंता होत असतो.
सदरच्या चौकाची समस्या वर्षांनुवर्षाची आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी मुंबई-आग्रा मार्गावरील उड्डाणपूल कामी येईल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यामुळे आणखीनच गोंधळ वाढला. याच चौकात पंचवटी येथून उड्डाणपुलावरून येणारी वाहतूक उतरण्यासाठी आणि पुन्हा उड्डाणपुलावर चढण्यासाठी येथेच गर्दी होते. याशिवाय कसारा तसेच आडगावसह अन्य ग्रामीण भागात जाणाºया अनेक प्रवासी वाहतुकीचे थांबे याच ठिकाणी आहेत. खासगी प्रवासी बसचे थांबे येथे आहेत.

Web Title: Dakarka's 'Chakravyuhah' is complicated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.