डाळ कडाडली, नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 04:15 PM2019-03-28T16:15:41+5:302019-03-28T16:15:55+5:30

उत्पादनात घट : वाळवणाच्या पदार्थांवर परिणाम

Dal kadali, employment collapses | डाळ कडाडली, नियोजन कोलमडले

डाळ कडाडली, नियोजन कोलमडले

googlenewsNext
ठळक मुद्देलग्न सराईचा हंगाम असल्याने डाळीच्या चढ्या भावाने नाकात दम आणला आहे.

खामखेडा : दैनंदिन जीवनात आहारात प्रथिने पुरविण्याच्या दृष्टीने डाळींना विशेष महत्व आहे. याशिवाय, उन्हाळ्यात वाळवणासाठी डाळींना विशेष मागणी असते. मात्र, यंदा उत्पादन घटल्याने डाळी सर्व सामान्याच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्या आहेत.
मागील वर्षी पावसाळा जेमतेम झाल्याने खरीपातील तुर, मठ, मुग, उडीद आदि पिकाचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे डाळीच्या किमती कमी होणार नाहीत हा अंदाज खरा ठरला. त्यातच चालु वर्षी परतीचा पाऊस न झाल्यामुळे हरभरा पिकाची लागवड कमी झाली आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या उत्पादनात घट झाली आहे. नवीन हरभरा बाजारात आला आत्रण अचानक हरभराच्या डाळीचे भावात वाढ झाल्याने महिलांचे वर्गाचे आर्थिक गणित कोलडमले आहे. सध्या सर्वत्र वाळवणाचे पदार्थ करण्याचे दिवस असल्याने या डाळीच्या भाववाढीमुळे वाळवणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. लग्न सराईचा हंगाम असल्याने डाळीच्या चढ्या भावाने नाकात दम आणला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात तुर डाळीचहीे भाव वाढल्याने मध्यमवर्गीय हैराण आहेत. नोव्हेबर-डिसेंबर अखेर राज्यस्थानातून तुर, मठ,मुग आदि बाजारात दाखल होते. प्रक्रि या उत्पादन करणारे व्यापारी या राज्यातून माल आयात करतात त्यामुळे डाळी प्रक्रि येवरील खर्च वाढतो .त्यामुळे डाळीच्या भावात वाढ झाली ासल्याच्या अंदाज व्यक्त केला जात आहे.
कडधान्यावर परिणाम
पूर्वी जिरायती शेती मोठया प्रमाणात होत असे. त्यामुळे बाजरी भईमुग कुळीद आदि पिकांमध्ये मठ,मग,उडीद,तुर आदि अंतर्गत पिके मोठया प्रमाणात घेतली जात असे. प्रत्येककडे मठ,मुग, उडीद, कुळीद,हरभरा,आदि कडधान्य आसायचे,परंतु बागायती क्षेत्र वाढू लागले आणि खरीप पिकांची जागा भाजीपाला वर्गीय पिकांनी घेतली. शेतकरी खरीप हंगामात भुईमग , बाजरी ऐवजी मक्याचे पिक मोठया प्रमाणात घेऊ लागले. त्यामुळे कडधान्य उत्पादनावर परिणाम होऊ लागला आहे.

Web Title: Dal kadali, employment collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक