बौद्ध धम्म परिषद रविवारी नाशिकमध्ये; दलाई लामा यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीसांनाही निमंत्रण
By दिनेश पाठक | Updated: February 27, 2025 20:15 IST2025-02-27T20:13:35+5:302025-02-27T20:15:41+5:30
४० ते ५० हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती

बौद्ध धम्म परिषद रविवारी नाशिकमध्ये; दलाई लामा यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीसांनाही निमंत्रण
दिनेश पाठक, नाशिक: ‘चलो बुद्ध की और...’ हा संदेश देत काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त येथील गोल्फ क्लब मैदानात रविवारी २ मार्चला राज्यस्तरीय भव्य धम्म परिषद होत आहे. जागतिक बौद्ध धम्म गुरू दलाई लामा यांच्यासह भारत, मलेशिया, जपान, नेपाळ, कंबोडिया, थायलंड आदी देशांतील धम्मगुरू, बौद्ध उपासक, अभ्यासक परिषदेला उपस्थित राहतील.
४० ते ५० हजार नागरिकदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत परिषदेचे स्वागतप्रमुख प्रकाश लाेंढे, भदन्त सुगत महाथेरो यांनी दिली. गाेल्फ क्लब मैदानावर परिषदेची तयारी करण्यात येत असून चार स्वतंत्र व्यासपीठ असतील. परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजीत पवार, केंद्रीय केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री कीरण रिजिजू, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आदी उपस्थित राहणार आहेत. सकाळी १० ते १२ काळाराम मंदिरात सत्याग्रहींना अभिवादन, दुपारी १२.३० वा.धम्मसंस्कार विधी व चर्चासत्र तसेच दुपारी चार वाजता बौद्ध धम्म परिषद होईल.