मालेगावी निर्बंधांविरोधात धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:14 AM2021-04-09T04:14:36+5:302021-04-09T04:14:36+5:30
मालेगाव : ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत व्यापाऱ्यांवर लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात यावेत, या मागणीसाठी मालेगावी व्यापारी व राजकीय पक्ष ...
मालेगाव : ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत व्यापाऱ्यांवर लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात यावेत, या मागणीसाठी मालेगावी व्यापारी व राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी निर्बंधांविरोधात येथील एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सुटका केली होती. जमावबंदी आदेश झुगारून विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये शहर पोलीस ठाण्यात आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या विरोधात काँग्रेस, जनता दलाने आंदोलन केल्यानंतर गुरूवारी एमआयएमचे डॉ. खालीद परवेझ यांच्या नेतृत्त्वाखाली एमआयएमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिका शाळा क्रमांक १ पासून मोर्चा काढला होता. मोर्चा किदवाई रोड मार्गे येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात काही काळ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर अटकेची कारवाई केली. त्यानंतर आंदोलकांना सोडून देण्यात आले. या आंदोलनात नगरसेवक माजीद युनूस इसा, साजीद रशीद मुकादम, अय्याज हलचल, अकील खान, शेख रऊफ, इब्राहीम सायकलवाला, बब्बू मेंबर आदिंसह ३० ते ४० जण सहभागी झाले.
----------------
व्यावसायिक अडचणीत
फोटो फाईल नेम : ०८ एमएपीआर ०१ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगावी लॉकडाऊनविरोधात येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात धरणे आंदोलन करताना एमआयएमचे डाॅ. खालीद परवेझ, माजीद युनुस इसा, साजीद रशीद मुकादम, अय्याज हलचल, अकील खान, शेख रऊफ, इब्राहीम सायकलवाला, बब्बू मेंबर आदी.
===Photopath===
080421\08nsk_1_08042021_13.jpg
===Caption===
फोटो कॅप्शन बातमीसोबत आहे.