बहुजन शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:11 AM2021-07-09T04:11:18+5:302021-07-09T04:11:18+5:30
अखिल भारतीय किसान संघर्ष समिती, भारत किसान मोर्चा, बहुजन शेतकरी संघटना, किसान सभा, आयटकच्यावतीने ट्रॅक्टरवर बसून हातात फलक घेऊन ...
अखिल भारतीय किसान संघर्ष समिती, भारत किसान मोर्चा, बहुजन शेतकरी संघटना, किसान सभा, आयटकच्यावतीने ट्रॅक्टरवर बसून हातात फलक घेऊन घोषणा देत केंद्र शासनाचा निषेध केला.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असताना महाराष्ट्र सरकार सुधारित कायदा कसा करू शकते, असा प्रश्न उपस्थित केला. राज्यातील शेतकरी संघटनेने महाविकास आघाडी नेत्यांना अधिवेशनापूर्वी भेटून अधिवेशनात केंद्र सरकारचा कृषी कायदा रद्द करण्याचा ठराव मांडण्यात यावा, असे आवाहन केले होते. मात्र राज्य सरकारने आमची निराशा केली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या कायद्याविरोधात भूमिका घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. केंद्र शासनाने शेतकऱ्यांची बाजू लक्षात घेऊन नव्याने केलेले तीनही कृषी कायदे रद्द करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
धरणे आंदोलनामध्ये किसान सभाचे राजू देसले, बहुजन शेतकरी संघटनेचे रमेश औटे, अशोक खालकर, नामदेव बोराडे, सुदाम बोराडे, आयटक जिल्हा अध्यक्ष व्ही. डी. धनवटे, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन राज्य अध्यक्ष विराज देवांग, जिल्हा अध्यक्ष अविनाश दोंदे, मधुकर सातपुते आदी सहभागी झाले होते.
(फोटो ०८ किसान)