वीज वितरण कंपनी विरोधात काँग्रेसचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 10:56 PM2018-04-09T22:56:01+5:302018-04-09T22:56:01+5:30
मालेगाव : शहरात सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, महावितरण कंपनीचे खासगीकरण रोखावे, नादुरुस्त रोहित्र तातडीने बदलावे आदींसह विजेच्या विविध समस्यांप्रश्नी शहर कॉँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील जुना आग्रारोडवरील वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मालेगाव : शहरात सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, महावितरण कंपनीचे खासगीकरण रोखावे, नादुरुस्त रोहित्र तातडीने बदलावे आदींसह विजेच्या विविध समस्यांप्रश्नी शहर कॉँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील जुना आग्रारोडवरील वीज वितरण कंपनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन छेडले होते. यावेळी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनात नगरसेवक अस्लम अन्सारी, साजीद अन्सारी, शकील जानीबेग, खलीलबाबा, अय्युब मो. अशरफ आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.वीज वितरण कंपनीकडून खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. होणारे खासगीकरण रोखावे, नादुरुस्त रोहित्र तातडीने बदलावे, अतिरिक्त वीज भार असलेल्या उपकेंद्रांवर योग्य उपकरणे बसवावेत, वीज गळती रोखावी, रिक्त पदांची तातडीने भरती करावी, फॉल्टी वीजबिले दुरुस्त करावीत आदी मागण्यांसाठी कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांनी धरणे आंदोलन छेडले होते.