धरणात पाणी, तरीही आणीबाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:52 AM2017-08-11T00:52:59+5:302017-08-11T00:53:13+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पुरेसा साठा असतानाही अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. तसेच अनेक भागात एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. केवळ जायकवाडीला पाणी मिळावे, यासाठी भाजपाची ही काटकसर सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

Dam water, still emergency! | धरणात पाणी, तरीही आणीबाणी!

धरणात पाणी, तरीही आणीबाणी!

Next

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात पुरेसा साठा असतानाही अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. तसेच अनेक भागात एकवेळ पाणीपुरवठा होत आहे. केवळ जायकवाडीला पाणी मिळावे, यासाठी भाजपाची ही काटकसर सुरू असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
दोन वर्षांपूर्वी कुंभमेळ्याच्या दरम्यान पावसाने दडी मारल्याने गंभीर संकट उभे राहिले होते. त्यावेळी मराठवाड्यासाठी असलेल्या जायकवाडी धरणासाठी नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आले होते. राज्यातील भाजपा सरकारने तसा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता दोन वर्षे चांगला पाऊस होत आहे. यंदाही जून आणि जुलै या दोन महिन्यांत मुबलक पाऊस असून, दहा धरणे भरली आहेत. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणातही मुबलक पाणी असल्याने विसर्ग करावा लागला आहे. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे शहराच्या अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. तसेच महापालिकेने अनेक ठिकाणी एकवेळ पाणीपुरवठा आजही कायम ठेवला आहे. स्थानिक नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असताना पाण्याचे कोणतेही नियोजन होत नाही. गंगापूर धरणातील हे पाणी जाणीवपूर्वक राखीव ठेवून नजीकच्या काळात ते मराठवाड्यासाठी देण्याचा भाजपाचा घाट असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. नाशिक शहराला गरजेपुरते पाणी मिळत असताना नाशिकमध्ये पाण्याची उधळपट्टी होत असल्याचा आरोप मराठवाड्यातील राजकीय नेत्यांकडून केला जातो. सध्या गरजेनुसार पाणी न वापरता नागरिकांना त्रास देऊन पाण्याची बचत केली जात आहे, तसे झाल्यास नाशिककरांना इतक्या पाण्याची गरज नाही हे मराठवाड्याचे म्हणणे खरे होऊ शकेल, असे बोरस्ते म्हणाले. गंगापूर धरण भरल्यानंतर महापौरांनी जलपूजन केले तेव्हाच ही मागणी आपण केली होती. परंतु तरीही त्याची दखल सत्ताधिकाºयांनी घेतली नसल्याचे बोरस्ते म्हणाले.

Web Title: Dam water, still emergency!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.