येवला तालुक्यातील २६ गावात वादळी पावसाने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 07:47 PM2020-09-09T19:47:02+5:302020-09-10T01:11:27+5:30
येवला : गेल्या तीन दिवसात झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील २६ गावांमधील ३ हजार १०४ शेतकऱ्यांच्या २ हजार १८८.९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती तहसिलदार रोहिदास वारूळे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

पंचायत समिती कृषी विभागाने सदर अंदाज दिला आहे. तालुक्यात शनिवार (दि.५) ते सोमवार (दि.७) दरम्यान जोरदार वादळी पाऊस झाल्याने मका, बाजरी, कांदा व कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले होते. तालुक्यातील २ हजार ११६.५० हेक्टरवरील मका, ७.०० हेक्टरवरील बाजरी, ८ हेक्टर क्षेत्रावरील कांदा, ५५ हेक्टर क्षेत्रावरील कांदा रोपे, २ हेक्टर क्षेत्रावरील डाळिंब पिकांचे नुकसान झाले आहे.