मालेगाव तालुक्यात ३४ घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 09:22 PM2020-06-04T21:22:09+5:302020-06-05T00:31:18+5:30

मालेगाव : तालुक्यात निसर्ग वादळामुळे १७ जनावरे दगावली असून सुमारे २७ कच्ची घरे कोसळल्याने अनेकांचे संसार उघडयावर पडले तर ७ पक्क्या घरांचे अंशत: नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दिली.

Damage to 34 houses in Malegaon taluka | मालेगाव तालुक्यात ३४ घरांचे नुकसान

मालेगाव तालुक्यात ३४ घरांचे नुकसान

Next

मालेगाव : तालुक्यात निसर्ग वादळामुळे १७ जनावरे दगावली असून सुमारे २७ कच्ची घरे कोसळल्याने अनेकांचे संसार उघडयावर पडले तर ७ पक्क्या घरांचे अंशत: नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी दिली.
कल बुधवारी शहरासह तालुक्यात जोरदार वादळी पाऊस झाला. यात सुदैवाने जीवितहानी टळली. तालुक्यातील निमगाव येथे एक गाय, वडनेर येथे एक म्हैस, कौळाणे निं येथे सर्वाधिक म्हणजे एक म्हैस, तीन पारडू , दहा मेंढ्या ठार झाल्या; तर दाभाडीत एक शेळी ठार झाली, घरांचे नुकसान मालेगाव तालुक्यात २७ कच्ची घरे वादळात कोसळून नुकसान झाले.
यात झोडगे येथे २, निमगाव ला ४, वडनेर ला १, मालेगाव ला २, कौळाने निं ला२, सायनेत ५ दाभाडीत ६ , करांजगव्हानला ३ तर सौंदाणेत २ कच्ची घरे पडून नुकसान झाले. ७ पक्क्या घरांचे अंशत: नुकसान झाले.
यात दाभाडीत ६ आणि सौंदाणेत एका पक्क्या घराचे वादळात अंशत: नुकसान झाले. दाभाडी मंडळात ३५क्विंटल कांद्याचे पावसात भिजल्याने नुकसान झाले
--------------------------
देवळा : चक्र ीवादळामुळे झालेल्या पावसात तालुक्यातील काही गावात घरांची पडझड झाली आहे. सुदैवाने या कोणतीही जीवितहानी किंवा शेतीपिकांचे नुकसान झाले नसल्याची प्राथमिक माहिती तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी दिली.चक्र ीवादळ येणार असल्याची पूर्वकल्पना हवामान खात्याने दिलेली असल्यामुळे तालुक्यातील शासकीय यंत्रणा, व नागरिक सतर्क झाले होते. सोशल मिडिया, तसेच स्थानिक प्रशासनाच्या वतीने नागरिकांना चक्र ीवादळाबाबत पूर्वसूचना देण्यात येऊन याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली होती. यामुळे शेतकरी वर्गाने शेतात उघडयावर असलेल्या भुईमुग, मका आदी पिकांबाबत योग्य ती काळजी घेतली व चाळीत साठवलेला कांदा भिजू नये याबाबत खबरदारी घेतल्यामुळे तालुक्यात शेती पीकांचे कोणतेही नुकसान झाले नाही. तसेच नागरिकांनी दिवसभर घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला होता. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी पडत असल्यामुळे रस्त्यावरील रहदारी रोडावली होती. दिवसभर शांत असलेल्या हवेने रात्री रौद्ररूप धारण केले होते. त्यातच पाऊसही सुरू होता. यामुळे तालुक्यातील पंडित भिका आहिरे (देवळा), पांडुरंग सखाराम सूर्यवंशी (फुलेनगर), सखुबाई महादू सोनवणे (मेशी), भिकुबाई बधा बागुल (मेशी), रामचंद्र लक्ष्मण आहेर (विठेवाडी), धनजी श्रीपत जाधव ( खर्डे) आदी शेतकर्यांच्या घराचे नुकसान झाले आहे. या शेतकर्यांच्या घरांचा झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

Web Title: Damage to 34 houses in Malegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक