मेशी परिसरात जोरदार पावसाने शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 06:59 PM2020-08-02T18:59:20+5:302020-08-02T19:00:01+5:30

मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात आठ दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्याने सर्व नालाबांध भरले आहेत. ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर अनेक घरांची पडझड झाली असून, शेतांमधये पाणी साचलयाने पिके खराब झाली आहेत.बाजरी, भुईमूग, मका व मुग भुईसपाट झाले असून पिकांचे मिठ्या प्रमानात नुकसान झाल्याने शासनाने तत्काळ भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.

Damage to agriculture due to heavy rains in Meshi area | मेशी परिसरात जोरदार पावसाने शेतीचे नुकसान

डोंगरगाव परिसरात पावसाने पिकांचे झालेले नुकसान. 

Next
ठळक मुद्देशासनाने तत्काळ भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे

मेशी : देवळा तालुक्यातील डोंगरगाव परिसरात आठ दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्याने सर्व नालाबांध भरले आहेत. ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर अनेक घरांची पडझड झाली असून, शेतांमधये पाणी साचलयाने पिके खराब झाली आहेत.बाजरी, भुईमूग, मका व मुग भुईसपाट झाले असून पिकांचे मिठ्या प्रमानात नुकसान झाल्याने शासनाने तत्काळ भरपाई देण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
या पाशर््वभूमीवर सरपंच दयाराम सावंत यांनी तहसीलदार व महसूल अधिकारी यांना याबाबत माहिती दिली आहे. तलाठी राजेंद्र गुंजाळ, कृषी सहाय्यक श्री ढवळे यांनी पाहणी केली आहे. नुकसानग्रस्तांना तत्काळ दिलासा द्यावा अशी मागणी सरपंच दयाराम सावंत, उपसरपंच सत्यभामा सावंत, लालजी सावंत यांनी केली आहे.

Web Title: Damage to agriculture due to heavy rains in Meshi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.