पावसामुळे शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 09:34 PM2020-06-15T21:34:53+5:302020-06-16T00:03:33+5:30
वाडीव-हे : इगतपुरी तालुक्यातील वाडीव-हे परिसरात रविवारी रात्री तब्बल साडेतीन तास मुसळधार पाऊस झाल्यामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दूबार पेरणीचे संकट देखील निर्माण झाले आहे.
वाडीव-हे : इगतपुरी तालुक्यातील वाडीव-हे परिसरात रविवारी रात्री तब्बल साडेतीन तास मुसळधार पाऊस झाल्यामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दूबार पेरणीचे संकट देखील निर्माण झाले आहे.
या मुसळधार पावसामुळे अनेक शेतक-यांचे शेतीचे बांध फोडून ओहोळ आण िनाले यांचे पानी थेट शेतात घुसल्याने नुकतेच शेतात मशागत करून भात रोपे तैयार करण्यासाठी भाताची पेरणी केली होती ती भात रोपे देखील वाहून गेली आहेत तर काही शेतात वाहून आलेल्या मातीचे ढिगारे तयार झाले आहेत.यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आता पुन्हा केव्हा शेताची दुरु स्ती करणार आणि नंतर केव्हा दुबार पेरणी करणार अशी परिस्थिति शेतकऱ्यांची झाली आहे. अगोदरच कोरोनाच्या पाशर््वभूमीवर लोकडाउन मध्ये शेतक-यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे त्यात पिहल्याच पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.त्यामुळे शासनाने या नुकसानीची पाहणी करून मदत द्यावी अशी मागणी शेतकर्यांमधून होत आहे.
----------------------
पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने कोरडीठाक असलेली देवनदी भरभरु न वाहु लागली आहे. दरम्यान सदरचे पाणी वणी सापुतारा रस्त्यावरील पुलाखालुन वाहु लागले. त्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर गाळ पाण्याबरोबर दिसू लागला. पाण्याच्या प्रवाहामुळे खंडेरावनगरमधील रहिवाशी सतर्क झाले होते.
------------------------------
वणीच्या देव नदीला पूर
वणी : सप्तशृंग गडावर पर्जन्यवृष्टी झाल्याने पर्वतरांगावरील पाण्याचा प्रवाह भातोडे गावातील नदीमार्गे वणीच्या देवनदीला येऊन मिळाल्याने देवनदीला पुर आला आहे. वणी व परिसरात पावसाने हजेरी लावली मात्र सप्तशृंगगड व पर्वतरांगांमधे जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. हे पाणी पर्वतरांगाच्या तळाला जाऊन भातोडे व लगतच्या नदीपात्रात गेले. हे पाणी देवननदीत गेले.