नुकसानीचे क्षेत्र चार लाख हेक्टरच्याही पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 01:58 AM2019-11-09T01:58:14+5:302019-11-09T01:59:21+5:30
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला होता. प्रत्यक्षात पंचनामे सुरू झाल्यानंतर नुकसानीची तीव्रता अधिक प्रकर्षाने समोल आली असल्याने जिल्ह्यातील नुकसानीचे क्षेत्र चार लाख हेक्टरच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. सध्या ३ लाख ८१ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
नाशिक : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला होता. प्रत्यक्षात पंचनामे सुरू झाल्यानंतर नुकसानीची तीव्रता अधिक प्रकर्षाने समोल आली असल्याने जिल्ह्यातील नुकसानीचे क्षेत्र चार लाख हेक्टरच्याही पुढे जाण्याची शक्यता आहे. सध्या ३ लाख ८१ हजार हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले तर शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतातील उभे पीक आडवे झालेच शिवाय काढणीच्या पिकाचाही फटका शेतकऱ्यांना बसला. द्राक्ष, मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग तसेच भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.