अस्ताणे परिसरात अतिवृष्टीने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:16 AM2020-09-07T00:16:35+5:302020-09-07T00:22:45+5:30

अस्ताणे : परिसरात अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अतिवृष्टीमुळे कपाशी, मका, कांद्याचे रोप आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एक दिवसाआड पाऊस पडत असल्याने शेतातील गवत काढता येत नसून पिके पाण्यात व गवतात वाया जात आहेत. त्यामुळे पिकांची वाढ थांबली आहे. याचा परिणाम येणाºया उत्पादनावर होणार आहे.

Damage caused by heavy rains in Astane area | अस्ताणे परिसरात अतिवृष्टीने नुकसान

अस्ताणे परिसरात अतिवृष्टीने नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देदुबार पेरणीचे संकट : सततच्या पावसामुळे जमिनी उपळल्या

अस्ताणे : परिसरात अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अतिवृष्टीमुळे कपाशी, मका, कांद्याचे रोप आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एक दिवसाआड पाऊस पडत असल्याने शेतातील गवत काढता येत नसून पिके पाण्यात व गवतात वाया जात आहेत. त्यामुळे पिकांची वाढ थांबली आहे. याचा परिणाम येणाºया उत्पादनावर होणार आहे.
शेतकऱ्यांनी आठ हजार रुपये पायली या दराने कांद्याचे बी बाजारातून आणले होते. दोन ते तीन वेळा टाकूनही ते पाण्यामुळे उगले नाही. त्यामुळे कांदा लागवड करण्यासाठी शेतकºयांना गावोगावी फिरण्याची वेळ आली आहे. सतत पाऊस सुरू असल्यामुळे जमिनी पूर्णपणे उपळल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे उत्पन्न अगदी खर्चही सुटणार नाही. कपाशीचा खर्चाचा विचार केला तर शेती न केलेली बरी अशी स्थिती जमीन उपळलेल्या शेतकºयांची झालेली आहे.
त्यामुळे या शेतकºयांच्या जमिनीचा पंचनामा करावा, अशी मागणी होत आहे.गेल्या वर्षीही अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास निसर्गाने हिसकावून घेतला होता. यावर्षी तर जून महिन्यापासूनच पावसाने सुरुवात केल्याने थांबायचे नावच घेत नाही. त्यामुळे शेतकºयांना एकतर शेती सोडावी लागली तर बाकीच्या पाण्यात गेली त्यामुळे विवंचनेत शेतकरी सापडला आहे. गेल्यावर्षी नुकसानीचे पैसे काही शेतकºयांना मिळाले; परंतु काही शेतकरी अद्याप भरपाईच्या पैशांपासून वंचित आहेत. संबंधितांनी शेतकºयांच्या खात्यात नुकसानीची रक्कम जमा करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

Web Title: Damage caused by heavy rains in Astane area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.