धरण साठ्यात १० टक्क्यांनी वाढ

By admin | Published: September 19, 2015 11:27 PM2015-09-19T23:27:36+5:302015-09-19T23:28:10+5:30

२४ तासात सरासरी ९० मिलीमीटरची नोेंद

Damage collection by 10 percent | धरण साठ्यात १० टक्क्यांनी वाढ

धरण साठ्यात १० टक्क्यांनी वाढ

Next

नाशिक : शुक्रवारी पहाटेपासून झालेल्या सलग १८ तासांच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठा सरासरी १० टक्क्यांनी वाढल्याचे वृत्त आहे. शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात १११६.२ (९० टक्के) मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे. शनिवारी (दि. १९) सकाळी मात्र स्वच्छ सूर्यप्रकाश झाल्यानंतर दुपारी पावसाने
तुरळक व मध्यम स्वरूपात हजेरी लावली.
जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे ३ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत सलग १८ तास पावसाने सर्वदूर हजेरी लावली. शनिवारी (दि. १९) सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९० (१११६.२) मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात तालुकानिहाय नोेंदविण्यात आलेल्या पावसाची मिलीमीटरमध्ये आकडेवारी पुढीलप्रमाणे- नाशिक-८३.६, इगतपुरी- १२६, दिंडोरी- ९७, पेठ- ९५.५, त्र्यंबकेश्वर- २८, मालेगाव - २२, नांदगाव- २३, चांदवड - ४५.२, कळवण - १४८.१, बागलाण - ७८, सुरगाणा - ११५, देवळा - ४२.६, निफाड - ९७.२, सिन्नर - ५२, येवला - ६१ असा एकूण - १११६.२
(सरासरी ९० टक्के) नोंदविण्यात आला. पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, खरिपास या पावसाचा फारसा फायदा होणार नसला तरी रब्बी हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील धरण साठा

जिल्ह्यात शुक्रवारचा पाऊस होण्याआधी जेमतेम सरासरी ३२ टक्केपाणीसाठा होता. शुक्रवारच्या पावसानंतर तो थेट सरासरी ४२ टक्के इतका झाला आहे. जिल्ह्यातील धरण साठा दलघफूमध्ये पुढीलप्रमाणे - कंसात एकूण टक्केवारी- गंगापूर- ३७६६ (६७ टक्के),  काश्यपी - ९११ (४९), गौतम गोदावरी- ८८0 (४७), पालखेड- ६४७ (८६),  करंजवण- १७५८ (३३), वाघाड- १३0३ (५२), ओझरखेड- ५८१ (२७),  पुणेगाव- ४१५ (६७), तिसगाव- १७९ (४0), दारणा- ४९४९ (६९), भावली-१३८७ (९७), मुकणे- २२३७ (३१), वालदेवी- ८६१ (७६), नांदुरमधमेश्‍वर-१६९ (६६), कडवा- १४७0 (७९), आळंदी- ५५५ (५७), भोजापूर- ८२ (१८),  चणकापूर- २२५२ (८३), पुनंद- १0११ (७२),  हरणबारी- १0५४ (९0), केळझर- ४५८ (८0), नागासाक्या- 00 (0), गिरणा- ६५६ (४) असा एकूण जिल्ह्यातील लहान-मोठे प्रकल्प मिळून ६६ हजार ३५४ पैकी २७ हजार ५८१ (४२ टक्के ) दलघफू इतका झाला आहे.

Web Title: Damage collection by 10 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.