चापडगावला डाळिंब, कलिंगडासह पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 02:25 PM2020-03-28T14:25:06+5:302020-03-28T14:25:29+5:30

सिन्नर: तालुक्यातील चापडगाव परिसरात अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रामुख्याने गहू, हरभरा, कांदा, डाळिंब, कलिंगड आदी पिकांना धोका पोहचला आहे.

 Damage of crops including pomegranate, kalingada to Chapadgaon | चापडगावला डाळिंब, कलिंगडासह पिकांचे नुकसान

चापडगावला डाळिंब, कलिंगडासह पिकांचे नुकसान

googlenewsNext

सिन्नर: तालुक्यातील चापडगाव परिसरात अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रामुख्याने गहू, हरभरा, कांदा, डाळिंब, कलिंगड आदी पिकांना धोका पोहचला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सिन्नर तालुक्याच्या बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाला आहे. शुक्र वारी (दि.२७) पहाटे चार व सकाळी सातच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकरी हवालिदल झाले आहेत. एकीकडे कोरोना आजारामुळे शेतमालाकडे दुर्लक्ष झाले असून बाजारपेठेत मंदीची लाट आहे. अशा परिस्थ्लिृतीत अवकाळी पावसामुळे शेतीलाही फटका सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (२८ सिन्नर १)

Web Title:  Damage of crops including pomegranate, kalingada to Chapadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक