साकुरी परिसरात पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 10:16 PM2019-11-07T22:16:37+5:302019-11-07T22:17:06+5:30

मालेगाव शिवरोड : साकुरीसह परिसरात ढगफुटीसदृश पावसामुळे घरांचे, शेतपिकांचे व शेतजमिनीच्या मृदेचे परतीच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या ढगफुटीसाख्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना सावरण्यास वेळ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.

Damage to crops in Sakuri area | साकुरी परिसरात पिकांचे नुकसान

साकुरी परिसरात पिकांचे नुकसान

Next
ठळक मुद्देमालेगाव : बाजरी, मका पीक गेले वाया

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव शिवरोड : साकुरीसह परिसरात ढगफुटीसदृश पावसामुळे घरांचे, शेतपिकांचे व शेतजमिनीच्या मृदेचे परतीच्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या ढगफुटीसाख्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना सावरण्यास वेळ मिळाला नसल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.
शेतात बाजरीच्या कणसांची सुडी, गोळा केलेला मका, कणीस हे सर्व पूरपाण्यात वाहून गेले. हाती येणारे उत्पन्न शेतातील माल मार्केटला विकण्याआधीच पावसाच्या पूरपाण्यात वाहून गेले. अंबर ठोके, अभिमन इंगळे, बाबाजी इंगळे, रमेश इंगळे, नारायण इंगळे, भगवान ठोके, प्रेमसिंग ठोके, ज्ञानेश्वर हिरे, तात्याभाऊ हिरे, अशोक हरकळ, नामदेव हरकळ, भरतनाथ हरकळ, विश्वनाथ हिरे, संग्राम ठोके, केवळ मोरे, पिंटू ठोके, समाधान ठोके, भागवत ठोके आदी शेतकºयांचे शेत नाल्याला लागून असल्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.
शासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. भरपाई देण्याची मागणींमालेगाव तालुक्यातील साकुरी (निं) परिसरात परतीचा पाऊस इतका भयंकर होता की, रस्ता, शेत व नदी एकत्र झाले. शेतामध्ये वाळूचा खच साचला आहे. पुन्हा शेती तयार करणे अशक्य होऊन बसले आहे. शेतकºयांचे प्रचंड नुकसान तर झालेच; पण शेतजमिनीच्या मृदेची धूप झाल्यामुळे झालेले नुकसान कसे भरून निघेल हा यक्षप्रश्न शेतकºयांपुढे उभा ठाकला आहे. हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम वाया गेला आहे. रब्बी हंगामाच्या तयारीसाठी हातात भांडवल नसल्याने शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडून पडले आहे. शासनाने शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.

Web Title: Damage to crops in Sakuri area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.