पाचोरेत कांदाचाळीत युरीया टाकल्याने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:49+5:302021-06-04T04:12:49+5:30
निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील पाचोरे बुद्रुक येथील कांदा उत्पादक शेतकरी सागर सानप या शेतकऱ्याने बडोदा बँकेकडून दीड लाखाचे कर्ज ...
निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील पाचोरे बुद्रुक येथील कांदा उत्पादक शेतकरी सागर सानप या शेतकऱ्याने बडोदा बँकेकडून दीड लाखाचे कर्ज घेतले होते. तसेच औषधे घेऊन अडीच एकरात उन्हाळ कांद्याचे पीक लावले होते. चार महिने काळजी घेत कांद्याचे उत्पादन घेतले. अंदाजे १६० ते १७० क्विंटल इतके कांद्याचे उत्पादन हाती आले. ह्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने सानप यांनी चाळीत कांदा साठवला होता. मात्र मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शेतीकामे सुरू होती. यादरम्यान तीन-चार दिवसांपासून कांदा चाळीकडे साफ दुर्लक्ष झाल्याचा फायदा घेत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चाळीतील कांद्यात युरिया टाकल्याने संपूर्ण कांदा खराब होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास गेल्याने सानप हवालदिल झाले आहेत.
फोटो- ०३ ओनियन युरीया
===Photopath===
030621\03nsk_54_03062021_13.jpg
===Caption===
फोटो- ०३ ओनियन युरीया