कांद्याला मोड आल्याने नुकसान
By admin | Published: November 18, 2016 10:12 PM2016-11-18T22:12:37+5:302016-11-18T22:19:24+5:30
भाव गडगडले : वर्षभरात बाजार समिती बंद, व्यापाऱ्यांचे आंदोलन कारणीभूत
पिळकोस : जिल्ह्यातील बाजारसमित्यामंध्ये आठवड्यातून फक्त चार दिवस लिलाव सुरु राहत असल्याने,याचा फटका सर्वच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून चाळीतल्या आज शिल्लक असलेल्या कांद्याला मोड आल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे .
बाजार समिती बेमुदत बंद करणे हे शेतकऱ््यांच्या हिताचे नसून बाजारसमिती बंद च्या काळात उन्हाळ कांदा व इतर शेतमाल रोखला जाता.े नंतर साहजिकचआवक वाढल्याने व्यापाऱ्यांकडून कांद्याला अंतिम भावाच्या तुलनेत सरासरी कमी भावाने कांदा खरेदी केलाजातो.यंदा उन्हाळ कांदा विक्र ी च्या बाबत शेतकऱ्यांची पिळवणूक झाली असल्याची तक्र ार आहे.
यंदाच्या वर्षीगेल्यापाच म हिन्याच्या कालावधीत प्रथम शासनाने आडत बंद ची घोषणा केल्यावर एकम हिनाभर बाजासामित्या बंद केल्या गेल्या .यानंतर बाजारसमित्या सुरु झाल्यावर व्यापार्यांची आडत बुडल्याने व्यापार्यांकडून कांद्याचे बाजारभाव पाडले गेले ,तेव्हा उन्हाळ कांदा चारशे -पाचशे ने विकला जाऊ लागला , एक महिनाभर कांदा माल रोखला गेल्याने बाजारसमितीत आवक वाढू लागली.बाजासामितीने व्यापार्यांच्या मर्जीनुसार खरीदी केलेला कांदा हा टाकण्यासाठी जागा शिल्लक नसल्याचे कारण पुढे करत बाजारसामित्या बंद केल्या. त्यांनतर ,कोपर्डी प्रकरण , मराठा मोर्चा या कालावधीत पुन्हा बाजार समित्या बंद व त्यानंतर दिवाळीच्या कालावधीत दहा ते पंधरा दिवस बाजासामित्या बंद ठेवल्या गेल्या व आता नोटा बंद झाल्यावर आठ दिवस बाजारसमित्या बंद झाल्यामुळे पुन्हा उन्हाळ कांदा रोखला गेला. आज कांद्याची टिकवण क्षमता पूर्णता संपली असून परिसरात थंडी वाढली असल्याने चाळीतल्या शिल्लक कांद्याल प्रचंड प्रमाणावर मोड आल्याने कांदा उकिरड्यावर फेकावा लागत आहे .( वार्ताहर )