सिन्नर तालुक्यात पीके पाण्याखाली गेल्याने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 03:45 PM2019-09-25T15:45:35+5:302019-09-25T15:45:58+5:30
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील कोकण म्हणून ओळख असणाऱ्या ठाणगाव परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. त्यामुळे बळीराजा पुरता खचला आहे.
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील कोकण म्हणून ओळख असणाऱ्या ठाणगाव परिसरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. त्यामुळे बळीराजा पुरता खचला आहे. मंगळवारी रात्री अकरा वाजेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. बुधवारी सकाळी आठवाजेपर्यंत वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु होता. या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून शेतकºयांना आपल्या शेतात काढणीसाठी अंतिम टप्पात आलेल्या वटाणा, टोमॅटो, सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शेतात सर्वत्र पाणीच पाणी असून जास्त पावसामुळे पिके सडू लागली आहेत. ठाणगाव परिसरात सुरवातीपासूनच पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे या भागातील सर्वच शेतकºयांनी दुबार पेरणी केलेली होती. त्यानंतर पीके काढणीसाठी आलेल असतांना पुन्हा झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी पीके भुईसपाट झाली आहेत. दुबार पेरणीमुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करु न मदत द्यावी अशी मागणी शेतकºयांच्यावतीने करण्यात येत आहे.
गत वर्षी पाऊस कमी प्रमाणात झालेला असल्याने शेतकºयांना पिके घेता आली नाही. चालू वर्षी पावसाचे प्रमाण सुरुवातीपासूनच जास्त होते. त्यामुळे सुरुवातीस केलेली पेरणी वाया गेली. दुबार पेरणी केली त्यामुळे पिके सुरळीत आली पण मंगळवारी अचानक झालेल्या पावसामुळे शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचल्याने पिके सडणार आहेत. एक एकर वटाण्यासाठी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येत असून अचानक झालेल्या पावसामुळे झालेला खर्च निघनेही मोठ्या जिकरीचे झाले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने पंचनामे करुन शासकीय मदत तात्काळ उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.