पालखेड कालव्याच्या पाण्याच्या अतिदाबामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:05 AM2019-08-18T00:05:15+5:302019-08-18T00:06:03+5:30

विंचूर : पालखेड डाव्या कालव्यास प्रमाणापेक्षा जास्त पाणी झाल्याने निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथे कालव्याचे पाणी झिरपून शेजारील शेतात येत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याची तक्र ार शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक येथे मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरली आहेत. पालखेड धरण समूह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पालखेड धरण भरले आहे. ओव्हरफ्लोचे पाणी सर्वत्र कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात सोडले जात आहे. कालव्याच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी सोडले गेल्याने कालवे ओसंडून वाहत आहेत.

Damage to farmers due to water pressure of Palkhed canal | पालखेड कालव्याच्या पाण्याच्या अतिदाबामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

पालखेड कालव्याच्या पाण्याच्या अतिदाबामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

Next
ठळक मुद्देअतिवृष्टी । धरण समूहात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा; शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्क
विंचूर : पालखेड डाव्या कालव्यास प्रमाणापेक्षा जास्त पाणी झाल्याने निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथे कालव्याचे पाणी झिरपून शेजारील शेतात येत असल्याने पिकांचे नुकसान होत असल्याची तक्र ार शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक येथे मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरली आहेत. पालखेड धरण समूह परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पालखेड धरण भरले आहे. ओव्हरफ्लोचे पाणी सर्वत्र कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात सोडले जात आहे. कालव्याच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी सोडले गेल्याने कालवे ओसंडून वाहत आहेत.
बºयाच ठिकाणी कालव्याला अतिप्रमाणात पाणी झाल्याने कालव्यालगत असलेल्या शेतकºयांचे नुकसान होत आहे. कालव्यातून लगतच्या शेतात पाणी पाझरून पिके सडण्याची शक्यता आहे. त्यातच विंचूरसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने शेतकºयांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पावसाने उघडीप दिली असली तरी कालव्यालगत असलेल्या शेतपिकांना धोका निर्माण झाल्याने पाटबंधारे विभागाने पालखेड धरण ओव्हरफ्लो झाल्याने कालव्याचे पाणी बंद न करता पाणी कमी प्रमाणात सोडावे. परिणामी पाण्याचा दाब कमी झाल्याने शेतकºयांचे नुकसान होणार नाही.अतिपावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावलापांडाणे : पावसाने तोंडाशी आलेले डाळिंबाचे पीक पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दिंडोरी तालुक्यातील कोशिंबा सजेतील विजय राव आदींनी दहीवा शिवारातील गट नं. २३३ व २३६ या सुमारे २५ एकरात भगवा नावाच्या डाळिंबाची लागवड केली होती. उन्हाळ्यात टॅँकरने पाणी टाकून डाळिंंबाची झाडे वाचविली, नंतर त्यांनी डाळिंबांची छाटणी केली. तद्नंतर झाडांना योग्य खत व पाण्याचे नियोजन करून चांगल्या प्रकारचा निर्यातक्षम डाळिंब बाग तयार केली. तद्नंतर जुलै महिन्यात सुरू झालेल्या पावसाने तोंडाशी आलेले डाळिंबाचे पीक पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जुलै व आॅगस्ट महिन्यात दिंडोरी तालुक्यात कोशिंबे परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला. त्यात संपूर्ण डाळिंब पिकाचे नुकसान झाले आहे. २५ एकरमध्ये दोन दिवस सह्याद्री कंपनीला निर्यातक्षम डाळिंब पाठविले व नंतर पावसाला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण डाळिंब पीक १६० ते १७० टन माल संपूर्ण पावसाने सडले असून, ८० ते ९० लाखांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने पंचनामा करून शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.२५ एकर डाळिंबांची शेती उन्हाळ्यात टॅँकरने विकत पाणी आणून बाग वाचविली. त्यात डाळिंबाचे पीक निर्यातक्षम तयार करून जुलै व आॅगस्ट महिन्यात झालेल्या पिकामुळे माझे सुमारे ९० लाखांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने याकडे गांभीर्याने पाहावे.
- सुभाष पवार,
डाळिंब बागायतदार

Web Title: Damage to farmers due to water pressure of Palkhed canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस