अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात भात शेतांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 08:55 PM2019-08-07T20:55:03+5:302019-08-07T20:55:44+5:30
वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील पश्चिम पट्यात गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसाने भात शेती धोक्यात आली असुन अतिवृष्टीमुळे बांध फुटल्याने बहुतांश ठिकाणी भात शेती भुईसपाट झाली आहे. दरम्यान नुकसान झालेल्या भात शेतीचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

वैतरणा धरण परिसरात यावर्षी सर्वाधिक पावसाची नोंद झाली असुन अतिवृष्टीमुळे शेवगेडांग, म्हसुर्ली, वांजोळे, आहुर्ली, आवळी, सातुर्ली, ओंडली, नागोसली, वैतरणा, धारगाव आदी भागामध्ये भात शेतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही ठिकाणी बांध फुटुन शेती भुईसपाट झाली आहे, तर काही ठिकाणी शेती मलब्याखाली दबली गेली आहे. यामुळे शेतांचे मोठे नुकसान झाल्याने गतवर्षी भात पिके संकटात आली आहेत.
वैतरणा परिसरात पावसाने सरासरी ओलांडली असुन इतिहासात प्रथम अशाप्रकारची अतिवृष्टी झाल्याचे बोलले जात असुन वैतरणा धरण गतवर्षी प्रथमच मृतसाठ्यापर्यंत पोहचले होते, यामुळे धरण भरते की नाही. अशा चर्चा रंगु लागल्या होत्या मात्र आठ दिवस झालेल्या अतिवृष्टी धरण तुडुंब भरून वाहु लागले. दरम्यान अतिवृष्टीने भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ प्रशासनाने पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.
वैतरणा - शेवगेडांग परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असुन भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील शेतांचे बांध फुटल्याने शेत पुर्णपणे भुईसपाट झाले आहेत. या नुकसानग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करून भरपाई मिळावी.
- विष्णू पोरजे,
चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष.