ओतूर परिसरात पावसाने मका, बाजरीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 10:57 PM2020-08-21T22:57:14+5:302020-08-22T01:16:06+5:30
कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात झालेल्या वादळी वाºयासह मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आमदार नितीन पवार यांनी पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई देण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या.
ओतूर : कळवण तालुक्यातील ओतूर परिसरात झालेल्या वादळी वाºयासह मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आमदार नितीन पवार यांनी पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई देण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या.
आठ दिवसांपासून परिसरात जोरदार वादळी वाºयासह पाऊस सुरू आहे. यामुळे शेतात पाणी साचले आहे. उभी पिके जमीनदोस्त झाली आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे राजेंद्र भामरे, जि. प. सदस्य यशवंत गवळी, संतोष देशमुख, साहेबराव देवरे, तहसीलदार बंडू कापसे, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, मंडल कृषी आधिकारी पाखरे, कृषी पर्यवेक्षक पी. एन. आहेर, सरिता राऊत, शेतकरी देवा भुजाडे, नागेश मोरे, भाऊसाहेब मोरे, दिगंबर पवार, देवेंद्र मोरे, रंगनाथ मोरे, मधुकर देवरे, मंगेश देसाई, युवराज मोरे, दीपक आहेर, धोंडू देशमुख आदी उपस्थित होते.