मांडवड परिसरात मक्यारचे न्ुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 10:43 PM2020-09-20T22:43:33+5:302020-09-21T00:53:59+5:30
मांडवड: गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मांडवड, लक्ष्मीनगर परिसरात पावसाने मका, कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. शाकंबरी नदीवरील तिन्ही धरण ओसंडुन वाहत असुन काल रात्री वादळी वार्यासह पाऊ स झाला. नांदगाव शहरातील शाकंबरी काठावरील नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाने शेतकऱ्यांनी शेतात टाकलेले कांद्याचे बियाणे व लागवड केलेले कांदे अक्षरश: वाहून गेले आहेत. शेतात उभे असलेल्या मका पिकात पाणी घुसल्याने पिक आडवे झाले आहे. बाजरीची लानी केलेले कणस पाण्यात सापडले आहेत. म्हणजे सर्व च बाजूने बळीराजा संकटात सापडला आहे. पावसामुळे झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहे. पावसाने शाकंबरी नदीला आलेल्या महापुरामुळे मांडवड ,नांदगाव रस्त्यावर असलेल्या महापुरुष बाबा चा फरशी पुलाला भगदाड पडले असून नांदगाव ला जाणाºया शेतकऱ्यांचा संपर्क च तुटला आहे. संबंधित विभागाने फरशी पुल दुरुस्त करावा ही मागणी नागरीकांनकडुन होत आहे.
शेतातील मका पिकात साचलेले पावसाचे पाणी. (२० मांडवड)