सुरगाण्यात वादळ-वाऱ्यामुळे आंबा, घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:31 PM2021-05-17T16:31:00+5:302021-05-17T16:32:04+5:30
सुरगाणा : तालुका परिसरात जोरदार वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी घरांचे छप्पर उडाल्याने, तर काही ठिकाणी आंबा गळून पडल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. रात्रीपासूनच वारा सुटला होता. मात्र, वाऱ्याचा जोर सकाळपर्यंत वाढल्याने काही ठिकाणी नुकसान झाले आहे. दुपार उलटूनही पाऊस मात्र झाला नाही.

सुरगाणा येथील राहुल आहेर यांच्या घरावर कडुनिंबाचे झाड पडले. सुदैवाने नुकसान झाले नाही, तर शिवाजी चौकातील प्रभाकर बिरारी यांच्या दुकानावरील पत्रे उखडले जाऊन विजेच्या तारेवर पडल्याने तार तुटली. सुरगाणा-माणी रस्त्यावरही झाड पडल्याने विजेच्या तारा तुटल्या. वाऱ्यामुळे तालुक्यातील सुरगाणा, भिंतीवर, उंबरठाण, पळसन, सांबरखल आदी ठिकाणी घराचे छप्पर व पत्रे उडाल्याने, तसेच आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
१. सांबरखल येथे उडालेले पत्रे.
२. सुरगाणा येथे घरावर मोडून पडलेला कडुनिंब वृक्ष.
३. भिंतघर येथे झाडावरून खाली गळून पडलेला आंबा. (१७ सुरगाणा १/२/३)