नाल्याच्या पाण्याने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2020 10:24 PM2020-07-26T22:24:35+5:302020-07-27T00:14:14+5:30
मालेगाव : महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न केल्याने नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी शेतात घुसून मका पीक भुईसपाट झाले, तर सिमेंटची पक्की विहीर ढासळून मोठे नुकसान झाले आहे. शासनामार्फत भरपाई मिळावी, अशी मागणी रमेश महारू बच्छाव या शेतकऱ्याने कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : महापालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न केल्याने नाल्यातील दुर्गंधीयुक्त पाणी शेतात घुसून मका पीक भुईसपाट झाले, तर सिमेंटची पक्की विहीर ढासळून मोठे नुकसान झाले आहे. शासनामार्फत भरपाई मिळावी, अशी मागणी रमेश महारू बच्छाव या शेतकऱ्याने कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सोयगाव येथील शिवरतन कॉलनी-शिवरस्त्यालगत सर्व्हे नं. ४९/१४९/२ येथे बच्छाव यांची शेती आहे. परिसरातून नाला गेला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यातील दुर्गंधीयुक्त सांडपाणी शेतात घुसल्याने पावणेतीन एकरावरील उभे मका पीक आडवे झाले, तर सिमेंटची पक्की विहीर ढासळली. या घटनेत मका पिकाचे सुमारे एक ते सव्वा लाखाचे, तर विहीर आणि इलेक्ट्रिक मोटरचे दोन ते अडीच लाख असे एकूण तीन ते साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मालेगाव महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी अयोध्यानगर ते गिरणा नदीत जाणाºया नाल्याची सफाई करून कचºयाची विल्हेवाट लावत असते. मात्र, यंदा महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले.
कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे धाव घेतल्यानंतर महापालिका यंत्रणा जागी झाली आणि सांडपाण्याला वाट करून दिली, असे बच्छाव यांनी सांगितले. सफाई करताना नाल्यातून काढलेला कचरा उचलला नाही. एरोमा थिएटरपासून ते गिरणा नदीपर्यंत नाल्याची सफाई करणे गरजेचे आहे. नालेसफाई केली गेली नाही तर एखादा मोठा पाऊस झाल्यास पुन्हा परस्थिती जैसे थे होणार आहे. तलाठी भिसे व कृषी सहायक ठाकरे यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. आयुक्त, तहसीलदार यांनाही निवेदन देण्यात आले आहे.२५ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे या नाल्यातून वाहणाºया सांडपाण्याला वाट न मिळाल्याने हे पाणी अयोध्यानगर, शिवरतन कॉलनी परिसरातील रहिवाशांच्या घरात घुसले. तसेच बच्छाव यांच्या शेतात घुसल्याने पावणेतीन एकरावरील उभे मक्याचे पीक भुईसपाट झाले.
शिवाय शेतातील सिमेंटकाँक्रीटची बांधलेली पक्की विहीर आणि इलेक्ट्रिक मोटरदेखील ढासळली. नुकसानीस महापालिकेचे आयुक्त व संबंधित अधिकारीच जबाबदार आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.