काजळीमुळे एक एकरावरील कोथिंबिरीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 01:33 AM2019-09-21T01:33:13+5:302019-09-21T01:33:47+5:30
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर परिसरात असलेल्या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या वायुप्रदूषणामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे व अन्य पिकांचे नुकसान होत असून, सीताबाई दिघे यांची अडीच एकरावरील कोथिंबीर पिकाचे काजळीमुळे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर परिसरात असलेल्या कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या वायुप्रदूषणामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांचे व अन्य पिकांचे नुकसान होत असून, सीताबाई दिघे यांची अडीच एकरावरील कोथिंबीर पिकाचे काजळीमुळे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दिंडोरी तालुक्यातील लखमापूर परिसरात मोठ्या प्रमाणात कारखाने असून, या ठिकाणी काही रासायनिक कारखानेदेखील आहेत. या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात बाहेर पडणाºया वायुप्रदूषणामुळे स्थानिक शेतकºयांचे द्राक्षबागांसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात यापूर्वी नुकसान झाले असल्याचा आरोप करीत परमोरी येथील शेतकरी दिघे यांच्या अडीच एकरावरील कोथिंबीरचे वायुप्रदूषणाद्वारे काजळीने नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पंचनामा केला असून, प्रदूषण मंडळाकडे तक्रारीचे निवेदन देण्यात आले आहे. या परिसरातील कंपन्यांमधून रात्रीच्या वेळी रासायनिक वायू सोडले जातात. त्यामुळे काजळीचा थर पिकांवर बसून नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी प्रदूषण मंडळाचे अधिकाºयांनी पाहणी केली असून, संबंधित कंपनी दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.