अज्ञात व्यक्तींकडून एक एकर वांग्याच्या झाडांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 11:17 PM2020-09-26T23:17:54+5:302020-09-27T00:42:56+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील माधव किसन आडोळे यांच्या एक एकर वाग्यांचे पिकावर कुणीतरी अज्ञात इसमाने रात्री अंधारात संपूर्ण वांग्याची फळे आलेली झाडे विळा व कोयत्याने तोडून लाखो रुपयाचे नुकसान केल्याची घटना परिसरात घडली .
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथील माधव किसन आडोळे यांच्या एक एकर वाग्यांचे पिकावर कुणीतरी अज्ञात इसमाने रात्री अंधारात संपूर्ण वांग्याची फळे आलेली झाडे विळा व कोयत्याने तोडून लाखो रुपयाचे नुकसान केल्याची घटना परिसरात घडली . शेतातील उत्पन्न सुरु असलेले वांग्याची फळे आलेली झाडे अज्ञात व्यक्तींनी तोडल्यामुळे आडोळे यांचे सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे काही झाडांची वांग्याची फळे विक्रिसाठी आलेली होती तर काही फळ धारनेवर आली होती. बाजारात वांगी पिकाला बाजार भाव चांगला असल्याने त्यांनी यंदा आपल्या शेतामध्ये एक एकर वांग्याच्या झाडांची लागवड केली होती. शेतात हजारो रूपयांचे मल्चिंग पेपर करून ड्रिप पद्धतीने त्यांनी जोमदार वांग्याची झाडे बनविली होती. मात्र कुणीतरी पूर्व वैमन्यस्यातुन आडोळे यांच्या शेतातील उभ्या असलेल्या वांग्याची रात्री अंधराचा फायदा घेवून विळे व कोयत्याने कत्तल करत नुकसान केले आहे. दूस-या दिवशी शेतात चक्कर मारून बघितले असता सर्व शेतात पुर्णपणे वांग्याची झाडे अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे लक्षात आल्यानंतर आडोळे यांच्या पायाखालची जमीन सरकली व हतबल झाले. याबाबत त्यांनी घोटी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येणार असून सुमारे एक लाख रूपयांचे नुकसान झाल्यामुळे इतर शेतकरी देखील आडोळे यांना आधार देत आहेत. दरम्यान लाखो रुपयाचे नुकसान झालेल्या शेतक?्यास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील शेतक-यांनी केली आहे.
माणिकखांब येथील माधव आडोळे या शेतक?्यांच्या एक एकर शेतीतील अज्ञात व्यक्तींनी वांग्याचे झाडांची तोडफोड करून असे नुकसान केले. (२६ नांदूरवैदद्य१)