साकुरला अज्ञाताकडून एक एकरवरील टोमॅटोंच्या झाडांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 08:44 PM2021-04-05T20:44:44+5:302021-04-06T00:16:42+5:30

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील रमेश बबन सहाणे यांच्या एक एकरवरील टोमॅटोची झाडे अज्ञात व्यक्तीकडून विळा व कोयत्याने तोडून लाखो रुपयाचे नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा संबंधित विभागाने पंचनामा करून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी रमेश सहाणे यांनी केली आहे.

Damage to one acre of tomato trees from unknown to Sakura | साकुरला अज्ञाताकडून एक एकरवरील टोमॅटोंच्या झाडांचे नुकसान

साकूर येथील रमेश सहाणे या शेतकऱ्यांच्या एक एकर शेतीतील अज्ञात व्यक्तींनी टोमॅटोच्या झाडांची नुकसान केल्याची पाहणी करताना, सभापती सोमनाथ जोशी समवेत उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव व सरपंच नामदेव खोकले.

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्याला लाखोंचा फटका : नुकसान भरपाई देण्याची मागणी

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील रमेश बबन सहाणे यांच्या एक एकरवरील टोमॅटोची झाडे अज्ञात व्यक्तीकडून विळा व कोयत्याने तोडून लाखो रुपयाचे नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा संबंधित विभागाने पंचनामा करून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी रमेश सहाणे यांनी केली आहे.
मागील वर्षी इगतपुरी तालुक्यातील माणिकखांब येथे एका शेतक-याची एक एकर वांग्याची झाडे अज्ञात व्यक्तींनी तोडल्याची घटना घडली होती. त्यानंतर, निनावी येथील शेतकऱ्याचे एक एकरावरील टोमॅटोच्या झाडांची अज्ञात व्यक्तींकडून नुकसान करण्यात आली होती. या एकापाठोपाठ घडलेल्या घटनांनंतर साकूर येथे रविवारी रात्रीच्या सुमारास शेतातील नुकतीच लावलेली व काही फुले येऊन वाढ झालेली टोमॅटोचे झाडे अज्ञात व्यक्तींनी तोडल्यामुळे सहाणे यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, या आधीही या परिसरात काकडी टोमॅटो, वांगी, भेंडी आदी पिकांचे दोन वर्षांपासून अज्ञात व्यक्तींकडून नुकसान करण्यात आले होते. बाजारात टोमॅटो पिकाला बाजार भाव चांगला असल्याने, त्यांनी यंदा आपल्या शेतामध्ये एक एकर टोमॅटोच्या झाडांची लागवड केली होती. या घटनेची माहिती मिळताच, इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, लक्ष्मीनगरचे सरपंच नामदेव खोकले आदींनी भेट देत, नुकसानीची पाहणी केली.


पूर्व वैमनस्यातून प्रकार
शेतात हजारो रुपयांचे मल्चिंग पेपर करून ड्रिप पद्धतीने त्यांनी जोमदार टोमॅटोची झाडे बनविली होती. मात्र, कुणीतरी पूर्व वैमनस्यातून सहाणे यांच्या शेतातील उभ्या असलेल्या टोमॅटोच्या झाडांची रात्री अंधाराचा फायदा घेऊन विळे व कोयत्याने कत्तल करत नुकसान केले आहे. दुसऱ्या दिवशी शेतात चक्कर मारून बघितले असता, सर्व शेतात पूर्णपणे टोमॅटोची झाडे अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे लक्षात आल्यानंतर सहाणे हतबल झाले.
 

Web Title: Damage to one acre of tomato trees from unknown to Sakura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.