पाटचारी फुटल्याने कांद्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 08:52 PM2020-05-07T20:52:03+5:302020-05-07T23:50:19+5:30
देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे चणकापूर उजवा कालव्यावरील वितरिका फुटल्यामुळे कांदा पीकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन कोरोनात शेतक-यास लाखो रूपयांचा फटका बसला असून सदर घटनेत दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे चणकापूर उजवा कालव्यावरील वितरिका फुटल्यामुळे कांदा पीकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन कोरोनात शेतक-यास लाखो रूपयांचा फटका बसला असून सदर घटनेत दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
चणकापूर उजव्या कालव्याला आवर्तन सुरू असतांना कालव्याच्या वितरीकेला मंगळवारी (दि.५ ) पहाटे पाणी सोडण्यात आले होते. परंतु मुख्य कालव्यापासून दिड कि.मी.वर या वितरीकेचा बांध शेतकऱ्यांनी कोरून अतिक्रमण केल्यामुळे कमकुवत झाला आहे. तसेच लगतच्या शेतक-यांनी चारीत झाडे ,झुडपे, गवत आदी कचरा टाकून पाणी प्रवाहास अडथळा निर्माण केल्यामुळे पाण्याचा फुगवटा निर्माण झाला व बांध फुटला. सदर पाणी वाजगाव येथील शेतकरी निवृत्ती देवरे यांच्या काढणीवर आलेल्या कांदा पिकात शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले. दिपक देवरे या शेतक-याने पाटचारी फुटल्याचे बघून त्वरित चणकापूर उजव्या कालव्याकडे धाव घेतली व पोटचारीचे दरवाजे बंद करून पाणी रोखले. सदर घटनेची माहिती उपसरपंच दिपक देवरे, पोलीस पाटील निशा देवरे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांना दिल्यानंतर चणकापूर उजवा कालवा उपविभागाचे सहा.अभियंता निलेश बाविस्कर, चौरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
-----
कारवाई करण्याची मागणी
पुनंद प्रकल्पातंर्गत चणकापूर उजव्या कालव्यावरील वितरीकेसाठी सोमवारी रात्री पाणी सोडण्यात आले होते. चारी लगतच्या शेतक-यांनी अतिक्र मण करून चारीचे बांध नष्ठ केले. तसेच झाडे ,झुडपे, गवत आदी कचरा टाकून पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण केल्यामुळे पाण्याचा फुगवटा निर्माण झाला. परिणामी चारीचे पाणी शेतात शिरले. शेतकऱ्यांना वितरिकेसाठी संपादीत क्षेत्राचा शासनाने मोबदला दिलेला असतानांही शेतकर्यांनी संपादीत क्षेत्रात बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केल्यामुळे पाटचारीचा बांध कमकुवत झाला. संबंधित विभागाने हे अतिक्रमण काढून पाटचारीची स्वच्छता करावी व चारीचे नूकसान करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.