चाळीत युरियायुक्त पाणी टाकुन कांद्याचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 12:09 AM2021-05-09T00:09:21+5:302021-05-09T00:13:11+5:30

खेडलेझुंगे : कोरोना आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे आधीपासून हैराण असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांचे कांदा लागवडीतून मोठे नुकसान झालेले आहे. सरासरीपेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकरी नाराज आहेत. असे असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत युरियामिश्रित पाणी टाकल्याने चाळीतील कांद्यांचे पूर्ण नुकसान केले आहे.

Damage of onion by pouring urea water in the sieve | चाळीत युरियायुक्त पाणी टाकुन कांद्याचे नुकसान

चाळीत युरियायुक्त पाणी टाकुन कांद्याचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देकांद्याच्या पोळीत अज्ञात इसमाने युरियायुक्त पाणी टाकून कांद्याची नासाडी

खेडलेझुंगे : कोरोना आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे आधीपासून हैराण असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांचे कांदा लागवडीतून मोठे नुकसान झालेले आहे. सरासरीपेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकरी नाराज आहेत. असे असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी एका शेतकऱ्याच्या कांदा चाळीत युरियामिश्रित पाणी टाकल्याने चाळीतील कांद्यांचे पूर्ण नुकसान केले आहे.

एप्रिल महिन्यात काढणी केलेला उन्हाळ कांदा शेतकरी चांगले बाजारभाव मिळावे या आशेने चाळीत साठवणूक करत असतो. या आशेनेच खेडलेझुंगे येथील अशोक दामोधर सदाफळ यांनी आपल्या शेतातील कांदा साठवणुकीसाठी घराशेजारील चाळीत आणून टाकला होता. त्यांच्या या कांद्याच्या पोळीत अज्ञात इसमाने युरियायुक्त पाणी टाकून कांद्याची नासाडी केली आहे.
डाळिंब आणि द्राक्ष शेतीला कंटाळून यांनी या वर्षी कांद्याचे क्षेत्र वाढविले होते. त्यात त्यांना भरघोस उत्पादन झाले होते. हा सर्व कांदा ट्रॅक्टरने भरून साठवणुकीसाठी घराशेजारील कांदा चाळीत समोर वाहून आणून टाकला होता.
कोरोना प्रादुर्भावामुळे कांदा साठवणुकीसाठी मजुरांच्या अभावी हा कांदा ७-८ दिवसांपासून चाळीशेजारी पडून होता. नेमकी हीच संधी साधत कुणी विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांनी यावर युरियायुक्त पाणी टाकून कांदा खराब करण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये २० ते २५ क्विंटल कांदा सडल्यामुळे विक्रीस योग्य राहिला नाही. या दुष्कृत्यामुळे सदाफळ यांचे प्रथमदर्शनी ३० हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे.
सुर्वातीला सध्याच्या उष्ण व अवकाळी पावसाच्या सरीमुळे कांदा सडला असावा, हा अंदाज बांधण्यात आला; परंतु साठवणूक करताना एकाच जागी खूप मोठ्या प्रमाणात कांदा सडल्यामुळे कोणाचा तरी खोडसाळपणा असावा, असा संशय निर्माण झाला. तंटामुक्ती अध्यक्ष शिवनाथ सदाफळ यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी व्यवस्थित पाहणी केल्यावर रासायनिक खताचा थर आढळून आला. कुणी तरी नुकसान करण्याच्या हेतूनेच हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाले.

उन्हाळ कांदा हा डिसेंबरपर्यंत चाळीत साठवलेला असतो. परिसरात आताशी कांदा चाळी भरण्यास सुरुवात झालेली असतानाच असा प्रकार घडल्याने शेतकरी वर्गात भीती पसरली आहे. दोषींना शोधून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

Web Title: Damage of onion by pouring urea water in the sieve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.