वादळी पावसाने शेतक-यांच्या पॉलिहाऊसचे नुकसान
By admin | Published: June 2, 2017 06:26 PM2017-06-02T18:26:11+5:302017-06-02T18:26:11+5:30
इगतपुरी तालुक्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने शेणीत येथील शेतकऱ्यांचे शेडनेटचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
बेलगाव कुऱ्हे (नाशिक), दि. 2 - इगतपुरी तालुक्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने शेणीत येथील शेतकऱ्यांचे शेडनेटचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
घोटी सिन्नर महामार्गावरील शेतकरी रतन जाधव, पंडित जाधव, लता जाधव यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत शेडनेटद्वारे शिमला मिरची, पॉलिहाऊसच यशस्वी प्रयोग केला होता.
मात्र अवकाळी वादळ वाऱ्याने त्यांचा घास हिरावून घेतल्याने ते हतबल झाले आहे. परिसरात कोणत्याही प्रकारचा रोजगार नसल्याने शेतकऱ्यांनी यांनी पारंपरिक शेती करत राष्ट्रीयकृत बँकेतून कर्जपुरवठा करून शेडनेट या आधुनिक शेतीचा नुकताच प्रयोग केला मात्र निसर्गाच्या अवकृपेने काही क्षणात नष्ट झाले.
वादळ व वाऱ्याने शेडनेटचे 8 ते 9 लाखाचे नुकसान झाल्याने त्यांच्या डोळ्यातील अश्रू मावेनासे झाले आहेत. चार ते पाच एकरवरील फळावर आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शेडनेटमधील शिमला मिरचीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. गुरुवारी (1 जून) मेघगर्जनेसह वादळ व गारपिटीने शेडनेट पूर्णपणे उद्धवस्त झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची तात्काळ दखल घेऊन आता मदत कधी मिळते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
झालेल्या नुकसानाचे शासनस्तरावर पंचनामा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
""क्षणात हिरावून घेतले सारं""
नुकतेच राष्ट्रीयकृत बँकेमधून कर्जपुरवठा घेऊन शेडनेटची शेती व पॉलिहाऊसची उभारणी केली होती. मात्र वादळ वाऱ्याने अवकाळीने सर्व काही क्षणभरात हिरावून घेतले आता जगावे तरी कसे?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने तात्काळ दखल घेऊन मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. -रतन पाटील जाधव, शेतकरी शेणीत