अधरवड शिवारात आगीत पोल्ट्री शेडचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:15 AM2021-04-27T04:15:05+5:302021-04-27T04:15:05+5:30
तालुक्यातील अधरवड येथे वाडीवऱ्हे येथील मालुंजकर परिवाराने काही वर्षांपूर्वी शेती विकत घेऊन शेतीला जोड़ धंदा म्हणून सुमारे २०० फुटांचे ...
तालुक्यातील अधरवड येथे वाडीवऱ्हे येथील मालुंजकर परिवाराने काही वर्षांपूर्वी शेती विकत घेऊन शेतीला जोड़ धंदा म्हणून सुमारे २०० फुटांचे एक ब्रॉयलर पोल्ट्री शेड कर्ज काढून बांधले आहे. अज्ञात व्यक्तीने येथील गवतावर काड़ी टाकून पळ काढला. त्यामुळे लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले आणि जळत जळत पोल्ट्रीजवळ आग आली. वारे जोरात वाहत असल्याने लागलेल्या आगीत पोल्ट्रीचे पडदे आणि इतर साहित्य जळून खाक झाले. याबाबतची माहिती संदीप मालुंजकर यांच्या पत्नीने त्यांना फोनवर दिली. तत्काळ वीस ते पंचवीस युवक घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी आले. मात्र, तोपर्यंत पोल्ट्रीची एक बाजू पूर्णपणे जळून गेली होती. याबाबत महसूल यंत्रणेने घटनेचा पंचनामा करून प्रशासनाकडे अहवाल द्यावा आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राम शिंदे, संदीप मालुंजकर यांच्यासह वसंत भोसले, विक्रम पासलकर, मनोहर जाधव,शरद नाठे, शिवाजी जमधडे, सुनील गुळवे, संतोष काजळे, सोमनाथ गायकर, रोहिदास गायकर, सोपान कातोरे, लक्ष्मण मुसळे, प्रवीण आवारी, अण्णा गायकर, मोहन झोमान, समाधान सहाने आदी पोल्ट्री व्यावसायिकांनी केली आहे. (२६ टाकेद)
===Photopath===
260421\26nsk_22_26042021_13.jpg
===Caption===
२६ टाकेद