छाटणी झालेल्या द्राक्ष बागांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 05:18 PM2019-11-01T17:18:58+5:302019-11-01T17:20:04+5:30

रोहिदास गायकवाड: कोकणगाव: कोकणगावह साकोरे शिरसगाव या भागात छाटणी झालेल्या तयार होत असलेल्या द्राक्षबागांचे सतत पडत असलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यापासून दररोज पाऊस व ढगाळ हवामान आहे.द्राक्ष बागांच्या गोड्या बार छाटणीच्या जवळपास अंतिम टप्प्यात आहेत.

Damage to pruned grape gardens | छाटणी झालेल्या द्राक्ष बागांचे नुकसान

नुकसान ग्रस्त द्राक्ष बागांची तलाठी सौ.नागोरे व कृषी अधिकारी राठोड , सरपंच अंबादास गांगुर्डे उपसरपंच भारत मोरे माणिक जाधव, प्रकाश गायकवाड, अनिल गायकवाड रमेश गायकवाड, शांताराम मोरे यांनी पाहणी करून पंचनामा केला

Next
ठळक मुद्दे- अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन भुईमूग मका तसेच द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी अहवाल झाले आहेत. नैसिर्गक आपत्ती मध्ये शेतकº्यांना शासनाने दिलासा देणे गरजेचे आहे, पिके गेले नि शेतकºयांच्या माथ्यावर कर्जाचा डोंगर

 


रोहिदास गायकवाड:
कोकणगाव: कोकणगावह साकोरे शिरसगाव या भागात छाटणी झालेल्या तयार होत असलेल्या द्राक्षबागांचे सतत पडत असलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यापासून दररोज पाऊस व ढगाळ हवामान आहे.द्राक्ष बागांच्या गोड्या बार छाटणीच्या जवळपास अंतिम टप्प्यात आहेत. मात्र छाटणी झालेल्या द्राक्ष बागात जास्त काळ पावसाने पाणी साचून राहत असल्याने द्राक्षे बागेचे मूळ बंद पडले आहे. याचा परिणाम द्राक्ष बागांच्या ओलांड्यावर होत आहे छाटणीनंतर निघणाऱ्या फुटवे यातील द्राक्ष माल अत्यल्प प्रमाणात निघत आहेत. तसेच निघालेला माल जिरत आहे व फळकूज होत आहे तर काही घडांचा आकार गोल होऊन गळून जात आहे.सर्वाधिक प्रमाणात पोंग्यात तसेच फुलोरा अवस्थेतील द्राक्षबागांचे नुकसान जास्त झालेआहे. याबागांवर फवारणी करूनही पीक हातात येण्याची शक्यता राहिली नसल्याने द्राक्ष उत्पादक बेजार झाले आहेत. यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या कष्टाला मर्यादा राहिली नाही नुकसान ग्रस्त द्राक्ष बागांची तलाठी सौ.नागोरे व कृषी अधिकारी राठोड , सरपंच अंबादास गांगुर्डे उपसरपंच भारत मोरे माणिक जाधव, प्रकाश गायकवाड, अनिल गायकवाड रमेश गायकवाड, शांताराम मोरे यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे

प्रतिक्रि या....

-परतीच्या पावसाने द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, निघालेले घड जिरू लागले आह.े फळकूज डाऊनीच्या रोगांचे संकट येणार आहे. खते औषधे व मजुरीचा लाखो रु पये खर्च केला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा फळा वीना उभ्या आहेत.

शांताराम बापुराव मोरे, द्राक्षउत्पादक शेतकरी, कोकणंगाव.

- अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन भुईमूग मका तसेच द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी अहवाल झाले आहेत. नैसिर्गक आपत्ती मध्ये शेतकº्यांना शासनाने दिलासा देणे गरजेचे आहे, पिके गेले नि शेतकºयांच्या माथ्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे अशा परिस्थितीत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकºयांना दिलासा देण्याची ची गरज आहे.

-दत्तात्रेय संपत गायकवाड, द्राक्षे उत्पादक, शेतकरी कोकणंगाव.

 

Web Title: Damage to pruned grape gardens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.