पावसाने टोमॅटो पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 11:49 PM2017-09-28T23:49:03+5:302017-09-29T00:08:53+5:30

 Damage of tomato crop by rain | पावसाने टोमॅटो पिकाचे नुकसान

पावसाने टोमॅटो पिकाचे नुकसान

Next

दिंडोरी : अचानक झालेल्या वादळी पावसामुळे दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे, ढकांबे, तळेगांव दिंडोरी परिसरातील शेतकºयांचे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे.
पावसाने टोमॅटो पीक पूर्णपणे जमिनीवर पडले असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. नुकसान झालेल्या पिकांची आमदार नरहरी झिरवाळ, प्रकाश वडजे, कृषी अधिकारी कैलास सोनवणे, वाळू जगताप यांनी पाहणी केली. आमदार नरहरी झिरवाळ यांनी नुकसान झालेल्या शेतकºयांनी तलाठी, कृषिसहायक व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून पंचनामे करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. यावेळी अजित खांदवे, गोपीनाथ गुंड, धनाजी खांदवे, सखाराम कडाळे, छगन कडाळे, राजू गुंड, सुरेश डबाळे, रमेश खांदवे, शिवाजी खांदवे, चंद्रभान खांदवे, तुकाराम खांदवे आदी उपस्थित होते.

Web Title:  Damage of tomato crop by rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.