खुडा न झालेल्या द्राक्षबागांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 10:29 PM2020-04-02T22:29:15+5:302020-04-02T22:29:41+5:30
दिंडोरी : संपूर्ण देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे नाशिक जिल्ह्यास द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. मागणीअभावी द्राक्षघड वेलीवर आहेत. ...
दिंडोरी : संपूर्ण देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे नाशिक जिल्ह्यास द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. मागणीअभावी द्राक्षघड वेलीवर आहेत. अनेक शेतकरी ते तोडून वाळत घालत आहेत तर काही शेतकऱ्यांनी द्राक्षांसह वेलींवर कुºहाड चालवली आहे. खुडा न झालेल्या व लॉकडाउननंतर बेभाव विकलेल्या द्राक्ष बागायतदारांना एकरी किमान अडीच लाख रु पये मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. आजची परिस्थिती आणीबाणीची आहे. मुख्यमंत्री व संपूर्ण शासन यंत्रणा जीव तोडून काम करत असल्याबद्दलही जगताप यांनी पत्रात त्यांचे आभार मानले आहेत. परंतु द्राक्ष उत्पादक शेतकºयांनी जर वेलींवर कुºहाड चालवली तर केवळ शेतकरी नाही तर त्यावर वर्षभर काम करणारे मजूर व अनेक व्यावसायिक उद्ध्वस्त होणार आहेत. म्हणून द्राक्ष पिकाकडे फक्त शेतपीक म्हणून न पाहता इंडस्ट्री म्हणून पाहावे, अशी विनंती त्यांनी पत्रात केली आहे. शिवाय राज्याची सगळी आर्थिक परिस्थिती पाहून मदत दोन टप्प्यात देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
शासन कोरोनासारख्या जागतिक आपत्तीशी संघर्ष करत आहे; पण द्राक्ष उत्पादकांचे दु:ख आता बघवत नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात आले आहे. संघटनेचे राजू शेट्टी स्वत: द्राक्ष उत्पादकांचे दु:ख मुख्यमंत्र्यांना सांगणात आहेत. मुख्यमंत्री आमच्या मागणीचा विचार करतील, अशी अपेक्षा आहे.
- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना