पाण्याच्या टाकीत तणनाशक टाकल्याने द्राक्षबागेचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 11:49 PM2020-11-13T23:49:24+5:302020-11-13T23:49:55+5:30
चिंचखेड येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी संदीप बाळासाहेब मेधने यांनी दीड एकर क्षेत्रावर द्राक्षबागेची लागवड केली आहे. या बागेची गोडीबहार छाटणी झाल्यानंतर निम्मी बाग पोंगा, तर निम्मी दोडा अवस्थेत होती, बागेसाठी फवारणीकामी लागणाऱ्या पाण्यासाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीत अज्ञात समाजकंटकाने तणनाशक टाकल्याने द्राक्षबागेचे ५ लाखांवर नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वणी पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे.
जानोरी : चिंचखेड येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी संदीप बाळासाहेब मेधने यांनी दीड एकर क्षेत्रावर द्राक्षबागेची लागवड केली आहे. या बागेची गोडीबहार छाटणी झाल्यानंतर निम्मी बाग पोंगा, तर निम्मी दोडा अवस्थेत होती, बागेसाठी फवारणीकामी लागणाऱ्या पाण्यासाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीत अज्ञात समाजकंटकाने तणनाशक टाकल्याने द्राक्षबागेचे ५ लाखांवर नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वणी पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे. मेधने हे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतात. त्यांनी आपल्या बागेची दोन टप्प्यात गोडीबहार छाटणी घेतली होती. बाग पोंगा व दोडा अवस्थेत असताना नवीन घड व द्राक्षवेलीची पाने जळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी टाकीतील पाणी व वेलीच्या काड्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर त्यामध्ये हे तणनाशक टाकल्याचे परीक्षणात समोर आले आहे. एवढे कष्ट घेऊनही आता हंगामातील नियोजन कोलमडले आहे. या घटनेबाबत त्यांनी वणी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे पुन्हा छाटणी करून हाती काही आले तर खरे, अन्यथा बाग तोडण्याची वेळ येऊ शकते, असे मेधने यांनी सांगितले.
----------------------